Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर

आगरकरांनी युवा बॅटरचं कौतुक केलं, पण...

By सुशांत जाधव | Updated: May 19, 2026 19:47 IST

Open in App

Ajit Agarkar On Vaibhav Suryavanshi India Debut : आयपीएल स्पर्धेत वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी धुमाकूळ घालणाऱ्या वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर टीम इंडियात संधी मिळायला हवी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. यासंदर्भात पहिल्यांदाच बीसीसीआय निवड समितीची अध्यक्ष अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे. युवा धडाकेबाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचं कौतुक करताना त्यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी त्याच्या वाटेत नेमका कोणता अडथळा आहे, तेच स्पष्टपणे सांगितले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो का?

भारत-अफगाणिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांना विचारण्यात आलं की, वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो का? यावर उत्तर देताना त्यांनी युवा फलंदाजाचं कौतुक केलं, मात्र सध्या यशस्वी जैस्वाल हा सलामीवीराच्या रुपात टीम इंडियाची पहिली पसंती असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार

आगरकरांनी युवा बॅटरचं कौतुक केलं, पण...

आगरकर म्हणाले की, "वैभव सूर्यवंशीने अप्रतिम कामगिरी करत आहे. पण आपण यशस्वी जयस्वाललाही विसरू शकत नाही. त्यानेही सातत्याने उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. वैभवचं इंडिया 'अ' संघात पोहोचणं ही मोठी उपलब्धी आहे आणि तो तिथेही चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे."

IPL मधील ओपनिंग पार्टनरमुळे वैभव सूर्यवंशी वेटिंगवर

वैभव सूर्यवंशीची श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी इंडिया 'अ' संघात निवड करण्यात आली आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा मोठा टप्पा मानला जात आहे. निवडकर्त्यांच्या मते, इंडिया 'अ' मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याच्यासाठी वरिष्ठ संघाचे दरवाजे उघडू शकतात. आयपीएलच्या सलग दुसऱ्या हंगामात त्याने धमाकेदार कामगिरीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून तो यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात करतो.  टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशीला IPL मधील आपल्या ओपनर पार्टनरमुळेच वेटिंगवर थांबावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Agarkar reveals obstacle for Vaibhav Suryavanshi's India team entry.

Web Summary : Ajit Agarkar acknowledged Vaibhav Suryavanshi's talent but highlighted Yashasvi Jaiswal's consistent performance as the main hurdle. Suryavanshi's selection for India 'A' is significant, with hopes for senior team entry contingent on his 'A' team performance. Jaiswal's presence impacts Suryavanshi's chances.
टॅग्स :वैभव सूर्यवंशीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारत-अफगाणिस्तानअजित आगरकरयशस्वी जैस्वाल