आयपीएल २०२६ नंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात क्रिकेटचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यात एकमेव कसोटी सामना आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार असून, या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, पंजाबचा २५ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याला कसोटी आणि वनडे अशा दोन्ही संघांमध्ये स्थान मिळाले. त्यानंतर क्रिकेट वर्तुळात गुरनूर ब्रारबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याला ६ जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर १४ जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी गुरनूर ब्रारची झालेली निवड ही त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मानली जात आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी
गुरनूर ब्रार देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने २०२२ मध्ये पंजाबकडून प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १८ प्रथम श्रेणी आणि ९ लिस्ट ए सामने खेळले आहेत. गुरनूर हा वेगवान गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपल्या अचूक आणि वेगवान गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळेच निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला असल्याचे बोलले जात आहे.
आयपीएलमधील प्रवास
गुरनूर ब्रार यापूर्वी दोन वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझींचा भाग राहिला आहे. गुजरात टायटन्स संघाने २०२५ च्या मेगा लिलावात त्याला १.३० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. यापूर्वी, २०२३ मध्ये पंजाब किंग्ज संघाने त्याला राज बावा याच्या बदली खेळाडू म्हणून २० लाख रुपयांना करारबद्ध केले. त्या हंगामात त्याला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
विराट कोहलीलाही नेट्समध्ये गोलंदाजी
२०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेदरम्यान गुरनूर ब्रार चर्चेत आला होता. त्या वेळी विराट कोहलीने खास तयारीसाठी गुरनूरला नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. गुरनूरची गोलंदाजीने किंग कोहलीही प्रभावित झाला. यानंतर गुरनूरचे नाव अधिक चर्चेत आले.
डेल स्टेनचा मोठा चाहता
एका मुलाखतीत गुरनूर ब्रारने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा आपला आदर्श असल्याचे सांगितले होते. गुरनूर म्हणाला की, "मी डेल स्टेनचा खूप मोठा चाहता आहे. त्याच्यामुळेच मी वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. जवळपास एक दशक त्याने जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. तो फक्त वेगवान गोलंदाज नव्हता, तर एक परिपूर्ण वेगवान गोलंदाज होता. त्याच्याकडील कौशल्यामुळेच तो जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक बनला. भारतीय संघात पहिल्यांदाच स्थान मिळाल्यानंतर आता गुरनूर ब्रारकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही छाप पाडेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
Web Summary : Punjab's Gurnoor Brar, a 6.5-foot tall fast-bowling all-rounder, has been selected for India's Test and ODI squads against Afghanistan. His domestic performance and ability to score quick runs lower down the order earned him the call-up. He previously played in the IPL for Gujarat Titans and was praised by Virat Kohli in the nets.
Web Summary : पंजाब के गुरनूर ब्रार, 6.5 फुट लंबे तेज गेंदबाजी ऑलराउंडर, को अफगानिस्तान के खिलाफ भारत की टेस्ट और वनडे टीम में चुना गया है। उनके घरेलू प्रदर्शन और निचले क्रम में तेजी से रन बनाने की क्षमता ने उन्हें यह मौका दिलाया। वह पहले आईपीएल में गुजरात टाइटन्स के लिए खेले थे और विराट कोहली ने नेट्स में उनकी प्रशंसा की थी।