Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?

मोहम्मद शमीला भारती संघात स्थान का नाही? आगरकरांनी असं दिलं उत्तर

By सुशांत जाधव | Updated: May 19, 2026 18:31 IST

Open in App

Ajit Agarkar On Mohammed Shami Absence From India Squad : अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या एकमेव कसोटीसह वनडे मालिकेसाठीच्या मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी दोन्ही प्रकारातील संघ निवडताना काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पण अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याला कोणत्याच संघात स्थान मिळालेले नाही. शमी हा देशांतर्गत क्रिकेटसह IPL मध्ये आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून देत असल तरी तो कसोटी आणि वनडेसाठी फिट नाही, असे स्पष्ट मत अजित आगरकर यांनी व्यक्त केले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मोहम्मद शमीला भारती संघात स्थान का नाही? आगरकरांनी असं दिलं उत्तर

मोहम्मद शमीला संघात स्थान का मिळालं नाही? यावर अजित आगरकर यांनी स्पष्ट भाष्य केलं. टीम इंडियाच्या निवडीनंतर ते म्हणाले की, मोहम्मद शमी हा निवड प्रक्रियेचा भाग नव्हता. त्याच्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आम्हाला जे सांगण्यात आलं आहे त्यानुसार, त्याचं शरीर सध्या जितकं परवानगी देतं, त्यानुसार तो खेळत आहे. मला माहिती आहे की, त्याने यंदा देशांतर्गत हंगाम खेळला आहे. पण सध्या तो फक्त टी-२० क्रिकेटसाठी तयार आहे. त्यामुळे त्याच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही," असं अजित आगरकर म्हणाले आहेत.

टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार

१६ सामन्यात ४७ विकेट्स! तरीही टीम इंडियात मिळाले नाही स्थान

मोहम्मद शमीने मागील रणजी ट्रॉफी हंगामात अप्रतिम गोलंदाजी केली होती. तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक होता. विजय हजारे ट्रॉफीतही त्याने प्रभावी कामगिरी केली होती. तरीही फिटनेस व्यवस्थापन आणि दीर्घकालीन वर्कलोड लक्षात घेऊन त्याला कसोटी आणि वनडे संघातून वगळण्यात आल्याचं मानलं जात आहे. ३५ वर्षीय शमीने १६ देशांतर्गत सामन्यांमध्ये एकूण ४७ विकेट घेतल्या. यात  रणजी ट्रॉफीत २० विकेट्स, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत १६ विकेट्स तर विजय हजारे ट्रॉफीत ११ विकेट्स अशी कामगिरी त्याने केली आहे.

कधी खेळला होता शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?

शमी टीम इंडियाकडून अखेरचा सामना हा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत खेळला होता. संधी मिळताच त्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत वरुण चक्रवर्तीच्या साथीनं संयुक्तरित्या सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या होत्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mohammed Shami's career over? Agarkar's statement sparks debate.

Web Summary : Mohammed Shami wasn't considered for the Afghanistan series due to fitness concerns and workload management, according to Ajit Agarkar. Despite his domestic performance, selectors felt he's currently suited only for T20 cricket, not Tests or ODIs. He last played in the Champions Trophy 2025.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारत-अफगाणिस्तानअजित आगरकरमोहम्मद शामी