Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...

Ajit Agarkar on Ravindra Jadeja Axar Patel, Team India IND vs AFG: आगामी वनडे मालिकेसाठी आज भारताचा संघ जाहीर करण्यात आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 20:03 IST

Open in App

Ajit Agarkar on Ravindra Jadeja Axar Patel, Team India IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिका आणि कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघ जाहीर झाला. आश्चर्याची बाब म्हणजे, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला नाही. एकदिवसीय संघातून या दोन्ही खेळाडूंना वगळण्याचा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्काच ठरला आहे. त्यांना संघातून का वगळले याबाबतचे स्पष्टीकरण मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने दिले आहे.

रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल यांची संघात निवड का नाही?

भारतीय संघाच्या निवडीनंतर अजित आगरकरने पत्रकार परिषद घेत सांगितले, "एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, एकदिवसीय विश्वचषक अजून १५-१६ महिने दूर आहे. आम्हाला अधिक पर्यायांचा शोध घ्यायचा आहे. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतले आहेत. आम्हाला नवीन खेळाडूंना संधी देऊन पाहायची आहे. अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा काय परिणाम घडवू शकतात याची सगळ्यांनाच कल्पना आहे. त्यामुळे सध्या त्यांना बाजूला ठेवून इतर खेळाडूंना संधी द्यायची आमची मानसिकता आहे."

मोहम्मद शमीचे पुनरागमन लांबणीवर

मोहम्मद शमी भारतीय संघात परत येईल अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. अजित आगरकरने याचेही कारण स्पष्ट केले. अजित आगरकर म्हणाला, "आम्हाला सांगण्यात आले आहे की मोहम्मद शमी सध्या फक्त टी२० क्रिकेटसाठी तयार आहे. त्यामुळे त्याच्या नावावर चर्चा झालेली नाही." विशेष म्हणजे, यशस्वी जैस्वाललाही भारतीय एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. जैस्वालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना शानदार शतक झळकावले होते, पण आता त्याची निवड झालेली नाही.

भारताचा एकदिवसीय संघ

कर्णधार शुभमन गिल, रोहित शर्मा (फिटनेस चाचणीनंतर उपलब्ध), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jadeja, Patel out of ODI squad: Agarkar clarifies selection decisions.

Web Summary : Ravindra Jadeja and Axar Patel's exclusion from the ODI squad raises eyebrows. Agarkar cites exploring options, eyeing South African conditions, and testing new players. Mohammed Shami is currently only ready for T20s. Selectors want to see what other players can bring to the team.
टॅग्स :भारत-अफगाणिस्तानअजित आगरकररवींद्र जडेजाअक्षर पटेलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ