Join us
Daily Top 2Weekly Top 5

RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय

या विजयासह राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्लेऑफ्सच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले आहे.

By सुशांत जाधव | Updated: May 19, 2026 23:49 IST

Open in App

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सविरुद्ध रॉयल विजय नोंदवला. २२१ धावांचा यशस्वी पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी याने ३८ चेंडूत ९३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय ध्रुव जुरेल याने ३८ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्लेऑफ्सच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून या शर्यतीतील चार संघांना बाद करत ते प्लेऑफ्समध्ये पोहचू शकतात.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मिचेल मार्शच शतक थोडक्यात हुकलं, जॉश इंग्लिसचीही अर्धशतकी खेळी

यशस्वी जैस्वाल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने दमदार सुरुवात केली. मिचेल मार्श ९६ (५७) आणि जॉश इंग्लिस ६० (२९) या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. निकोलस पूरन ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. कर्णधार रिषभ पंतने २३ चेंडूत दिलेल्या ३५ धावांच्या योगदानाच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२० धावा करत राजस्थान रॉयल्ससमोर २२१ धावांचे टार्गेट सेट केले होते. LSG कडून यश राज पुंजा याने सर्वाधिक २ तर जोफ्रा आर्चरनं एक विकेट घेतली.

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)

वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार शो! 'ध्रुव तारा'ही चमकला

या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. एका बाजूला वैभव सूर्यवंशी संयमी खेळी करत असताना दुसऱ्या बाजूनं कार्यवाहू कर्णधार यशस्वी जैस्वालनं आक्रमक पवित्रा घेतला. त्याने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. तो परतल्यावर वैभव सूर्यवंशीनं गियर बदलला. ३८ चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९३ धावांची धमाकेदार खेळी करत सामना राजस्थानच्या बाजूनं सेट केला. दुसऱ्या बाजूला ध्रुव जुरेल याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने डोनोव्हन फरेरा १६ (१०) साथीनं राजस्थानच्या संघाचा विजय निश्चित केला. लखनौकडून गोलंदाजीत आकाश महाराज सिंग आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan Royals Triumph Over Lucknow Super Giants in Thrilling Chase

Web Summary : Vaibhav Suryavanshi's explosive 93 and Dhruv Jurel's unbeaten 53 powered Rajasthan Royals to a stunning victory over Lucknow. The win strengthens Rajasthan's playoff bid; a final win secures their spot.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सलखनौ सुपर जायंट्सवैभव सूर्यवंशीयशस्वी जैस्वाल