Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट

लेदर बॉल हातात आला अन् BCCI कडून बंदीची कारवाई झाली आता मिळाली टीम इंडियात संधी

By सुशांत जाधव | Updated: May 19, 2026 20:59 IST

Open in App

IPL 2026 LSG Pacer Prince Yadav Picked For India : आयपीएल स्पर्धेनंतर घरच्या मैदानात अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने IPL मध्ये खास छाप सोडणाऱ्या प्रिन्स यादवला टीम इंडियात पहिली संधी दिली आहे. पण तुम्हाला माहितीये का? प्रिन्स यादवचा इथपर्यंतचा प्रवास सहज सोपा नव्हता. वयाच्या १७ व्या वर्षांपर्यंत टेनिस क्रिकेट खेळणारा हा जलदगती गोलंदाज लेदर बॉल क्रिकेटला सुरुवात केल्यावरच अडचणीत सापडला. वय लपवण्याच्या प्रकरणात २०१९ मध्ये त्याच्यावर बीसीसीयाने दोन वर्षांची कारवाई केली. आता याच पठ्ठ्यानं IPL मध्ये शड्डू ठोकत टीम इंडियाच्या संघात स्थान मिळवलं आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टेनिस बॉल क्रिकेटसह प्रवास सुरु झाला

दिल्लीच्या प्रिन्स यादवचा क्रिकेटचा प्रवास हा टेनिस बॉलसह सुरु झाला. वयाच्या १७ वर्षांपर्यंत त्याने लेदर बॉल हातातही घेतला नव्हता. टेनिस बॉल क्रिकेटमुळेच तो जलदगती गोलंदाजाच्या रुपात घडला. यॉर्कर बॉल ही त्याची ताकद आहे. याशिवाय अचूक टप्प्यावर इनस्विंग आणि आउट स्विंगसह तो प्रतिस्पर्धी फलंदाजाला गुडघे टेकायला लावण्याची क्षमताही बाळगतो.

टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर

लेदर बॉल हातात आला अन् BCCI कडून बंदीची कारवाई झाली

डिसेंबर २०१९ मध्ये बीसीसीआयने वयात फेरफार केल्याप्रकरणी अनेक युवा क्रिकेटर्सवर बंदीची कारवाई केली होती. त्यात प्रिन्स यादवच्या नावाचाही समावेश होता. वय लपवल्याप्रकरणी त्याला दोन वर्षांच्या बंदीची कारवाई झाली. बंदी संपताच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत १० सामन्यात १३ विकेट्स घेत त्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले. 

IPL मध्ये लाखमोलाची संधी मिळाली अन् त्यानं त्याचं सोनं करून दाखवलं

२०२५ च्या हंगामात ३० लाख रुपयांसह तो लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यात सामील झाला. या हंगामात त्याने ६ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. पण यंदाचा हंगामात त्याच्यासाठी एकदम खास राहिला. १२ सामन्यात १६ विकेट्स घेत किंग कोहलीच्या विकेटसह तो चर्चेत आला. 

रोहित-विराटसोबत वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न

यंदाच्या हंगामातील दमदार कामगिरीनंतर प्रिन्स यादव याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे, ही गोष्ट बोलून दाखवली होती. हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं त्याने पहिले पाऊल टाकले आहे. वनडेत खास छाप सोडून संघातील स्थान टिकवत तो वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL to Team India: Prince Yadav's dream with Rohit, Virat.

Web Summary : From tennis-ball cricket to Team India! Prince Yadav overcame a ban for age fudging to shine in the IPL. His dream? To play alongside Rohit Sharma and Virat Kohli in the World Cup 2027.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२६भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय