लखनौ सुपर जाएंट्सचा सलामीवीर मिचेल मार्श याने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आणखी एक धमाकेदार खेळी केली. पण सलग दुसऱ्या सामन्यात तो नव्वदीच्या घरात फसला अन् शतकाला मुकला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात ३८ चेंडूत ९० धावांची खेळी करणाऱ्या मिचेल मार्शनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५७ चेंडूत ९६ धावांची दमदार खेळी केली. डावातील अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना तो धावबाद झाला. यशस्वी जैस्वालनं डायरेक्ट थ्रोसह त्याच्या खेळीला ब्रेक लावला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यातही तो धावबादच झाला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकाच षटकात LSG नं पंतसह मार्शची रन आउटच्या रुपात गमावली विकेट
जॉश इंग्लिससोबत डावाची सुरुवात करताना त्याने शतकी भागीदारीसह राजस्थानच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० चेंडूत १०९ धावांची खेळी केली. जॉश इंग्लिस २९ चेंडूत ६० धावा करून परतल्यावर मिचेल मार्श आणि रिषभ पंत जोडी जमली. पण दोघेही एकाच षटकात धाव बाद झाले. अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरनं उसळता चेंडू टाकत मिचेल मार्शला चकवा दिला. नॉन स्ट्राइकवरुन रिषभ पंत एक धाव घेण्यासाठी धावला अन् जोफ्राने त्याला धावबाद केले. LSG च्या कर्णधाराने २३ चेंडूत ३२ धावांची भर घातली. याच षटकातील पाचव्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना मार्शनं धावबादच्या रुपात विकेट गमावली. त्याच्या शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. जोफ्रा आर्चरनं शेवटच्या चेंडूवर आयुष बडोनीला बोल्ड करत हे षटक फक्त ५ धावा खर्च करत संपवले.
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
वादळी खेळीसह ऑरेंज कॅप पटकावली, पण..
यंदाच्या हंगामात RCB विरुद्ध त्याच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले होते. राजस्थान विरुद्धच्या ९६ धावांच्या खेळीसह १३ सामन्यात ५६३ धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत त्याने हेन्रिक क्लासेनला मागे टाकले. क्लासेन याने १३ सामन्यात ५५५ धावा केल्या आहेत. मार्शनं ऑरेंज कॅप पटकावली असली तरी यंदाच्या हंगामात शेवटपर्यंत ती कायम ठेवणं त्याच्यासाठी शक्य नाही. कारण LSG चा संघ आधीच स्पर्धेतून बाद झाला आहे. उर्वरित एका सामन्यासह तो स्थान भक्कम करू शकतो. पण प्लेऑफ्सच्या लढतीत तो मागे पडेल.
Web Summary : Mitchell Marsh narrowly missed a century against Rajasthan Royals, scoring 96 after a blistering 90 against Chennai. He was unfortunately run out in the final over, mirroring his previous dismissal. Despite an Orange Cap bid, LSG's exit impacts his chances.
Web Summary : मिचेल मार्श राजस्थान रॉयल्स के खिलाफ शतक से चूक गए, उन्होंने चेन्नई के खिलाफ 90 रनों की शानदार पारी के बाद 96 रन बनाए। दुर्भाग्य से वह अंतिम ओवर में रन आउट हो गए, जैसा कि पिछली बार हुआ था। ऑरेंज कैप की दौड़ में, एलएसजी के बाहर होने से उनकी संभावनाओं पर असर पड़ेगा।