Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात

By सुशांत जाधव | Updated: May 20, 2026 00:32 IST

Open in App
1 / 8

आधुनिक क्रिकेट जगतातील 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी याने जयपूरच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात ३८ चेंडूत ९३ धावांची वादळी खेळी करताना १० षटकार मारले.

2 / 8

षटकारांच्या आतषबाजीसह तो आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

3 / 8

आयपीएल २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी याने १३ सामन्यात ५३ षटकार मारले आहेत. आता ख्रिस गेलचा महारेकॉर्ड त्याच्या अगदी टप्प्यात आला आहे. यासाठी त्याला फक्त ७ षटकारांची आवश्यकता आहे. त्याचा फॉर्म पाहता यासाठी त्याला एक डावही पुरेसा आहे.

4 / 8

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्याच्या घडीला ख्रिस गेलच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजच्या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएलमधील २०१२ च्या हंगामात ५९ षटकार मारून हा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेलनं २०१३ च्या हंगामातही षटकारांचे अर्धशतक साजरे करताना ५१ षटकार ठोकले होते.

5 / 8

आयपीएलच्या एका हंगामात ५० षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आंद्रे रसेलचाही समावेश आहे. मसल पॉवर रसेलनं २०१९ च्या हंगामात ५२ षटकार खेचले होते.

6 / 8

जोस बटलर या यादीत ४५ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. २०२२ च्या हंगामात त्याने ही कामगिरी करून दाखवली होती.

7 / 8

आघाडीच्या ७ फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेलचं नाव तीन वेळा दिसते. २०१२ आणि २०१३ च्या हंगामाशिवाय २०११ च्या हंगामात त्याने ४४ षटकार मारले होते.

8 / 8

एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या सात फलंदाजांमध्ये अभिषेक शर्माचाही समावेश आहे. त्याने २०२४ च्या हंगामात ४२ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सलखनौ सुपर जायंट्सवैभव सूर्यवंशी