कारचा कट बसला; दुचाकीस्वार थेट रस्त्यावर पडला, डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 17:44 IST2026-05-13T17:42:58+5:302026-05-13T17:44:31+5:30

दुचाकीस्वार तरुणाच्या मागे बसलेल्या मैत्रिणीच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे

Car hits bike; Biker falls directly on road, dies after truck wheel goes over head | कारचा कट बसला; दुचाकीस्वार थेट रस्त्यावर पडला, डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मृत्यू

कारचा कट बसला; दुचाकीस्वार थेट रस्त्यावर पडला, डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मृत्यू

मंचर : दुचाकीला वाहनाची कट लागल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. ऋषिकेश गोरख सुर्वे (वय. २७ रा. वाघोली मूळ रा. वानेवाडी ता. तुळजापूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून हा अपघातमंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव चौकाजवळ मंगळवारी सायंकाळी घडला.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गोरख सुर्वे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवरून मैत्रिणीसोबत मंचर बाजूकडून नारायणगाव बाजूकडे चालला होता. त्यावेळी नारायणगाव बाजूकडे चाललेल्या कारने उजव्या बाजूने ओव्हरटेक करताना मोटारसायकलचा हँडल कारच्या पाठीमागील बाजूस लागला. त्यानंतर दुचाकीवरील ऋषिकेश हा रस्त्यावर पडला. समोरून नारायणगाव बाजूकडून ट्रक वेगाने आला. सदर ट्रकचे चाक ऋषिकेशच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या मैत्रिणीच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. मैत्रिणीचे नाव समजू शकले नाही. याप्रकरणी तेजस गोरख सुर्वे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर ट्रकचालक गुलाम अब्बास सय्यद (रा. मंचर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलिस करीत आहेत.

Web Title : कार की टक्कर से बाइक सवार की मौत; ट्रक ने कुचला

Web Summary : मंचर के पास एक कार ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे बाइक सवार गिर गया और उसकी मौत हो गई। एक ट्रक ने उसे कुचल दिया। उसकी महिला साथी गंभीर रूप से घायल हो गई। पुलिस ने ट्रक ड्राइवर के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Car Hit Kills Biker; Truck Runs Over Him

Web Summary : A biker died near Manchar after a car hit his motorcycle, causing him to fall. A truck then ran over him. His female companion was seriously injured. Police have registered a case against the truck driver.