IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)

IPL 2026 RCB vs KKR Virat Kohli Celebrated His First Run After Back To Back Duck  : रायपूरच्या मैदानातील ...

By सुशांत जाधव | Updated: May 13, 2026 23:06 IST2026-05-13T23:00:48+5:302026-05-13T23:06:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RCB vs KKR Virat Kohli Celebrated His First Run After Back To Back Duck Fans Reaction Goes Viral | IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)

IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)

IPL 2026 RCB vs KKR Virat Kohli Celebrated His First Run After Back To Back Duck  : रायपूरच्या मैदानातील कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार विराट कोहलीनं खाते उघडल्यावर शतक साजरे केल्याच्या अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. मागील दोन सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता. त्यामुळेच पहिली धाव घेतल्यावर विराट कोहलीनं आनंद साजरा केला. विराट कोहलीचा हा अंदाज पाहून स्टेडियमवर उपस्थितीत RCB चे चाहतेही शॉक झाल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दिसला होता असा अंदाज

 विराट कोहलीनं खाते उघडल्यावर सेलिब्रेशन करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्याचा हा अंदाज पाहिल्यावर अनेकांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील त्याचे सेलिब्रेशन आठवले असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडेत टीम इंडियाकडून खेळताना सलग दोन सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात खाते उघडल्यावर  त्याने अगदी अशाच तोऱ्यात आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्याने जो काही धमाका केले तो आतापर्यंत सुरु आहे. जे टीम इंडियाकडून करून दाखवलं तसेच तो यंदाच्या उर्वरित हंगामात RCB साठी करुन दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

कोलकाता विरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहलीनं रचला इतिहास

विराट कोहलीसाठी रायपूरच्या मैदानातील कोलकाता विरुद्धचा सामना खास राहिला. कारण IPL च्या इतिहासात सर्वाधिक २७९ सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला. या सामन्यात मैदानात उतरताच त्याने MS धोनी आणि रोहित शर्मा  यांना मागे टाकले. धावांचा पाठलाग करताना मागील सामन्याची कसर भरून काढत त्याने या सामन्यात मोठी खेळी करावी, अशी RCB संघासह चाहत्यांची अपेक्षा आहे.  

Web Title : आईपीएल 2026: केकेआर के खिलाफ पहला रन बनाने पर कोहली का 'शतकीय जश्न'

Web Summary : विराट कोहली ने केकेआर के खिलाफ अपना पहला रन एक शतक की तरह मनाया, जिससे आरसीबी के प्रशंसक हैरान रह गए। उन्होंने धोनी और रोहित शर्मा को पीछे छोड़ते हुए अपना 279वां आईपीएल मैच खेला। कोहली ने पहले ऑस्ट्रेलिया दौरे पर भी इसी तरह जश्न मनाया था।

Web Title : IPL 2026: Kohli's 'Century Celebration' on Scoring First Run Against KKR

Web Summary : Virat Kohli celebrated scoring his first run against KKR like a century after recent ducks, shocking RCB fans. He surpassed Dhoni and Rohit Sharma by playing his 279th IPL match. Kohli previously celebrated similarly during an Australia tour.