Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाला, दमदार कमबॅक करत नवा इतिहास रचला

By सुशांत जाधव | Updated: May 14, 2026 00:24 IST2026-05-14T00:21:32+5:302026-05-14T00:24:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RCB vs KKR Virat Kohli 9th IPL Century Breaks Chris Gayle's World Record Becomes Fastest Batter In The World score 14,000 runs in T20s | Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

IPL 2026 RCB vs KKR Virat Kohli 9th IPL Century Breaks Chris Gayle's World Record  : रायपूरच्या मैदानातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावले.  सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर दमदार कमबॅक करताना शतकी खेळीसह विराट कोहलीनं या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले.  टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा पल्लाही त्याने गाठला. सर्वात जलदगतीने हा डाव साधणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीनं ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ख्रिस गेलच्या वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग, कोहलीनं रचला नवा इतिहास

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर १९३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहीलनं ७८ धावा करताच टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा पल्ला गाठला. हा टप्पा गाठणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. एवढेच नाही तर सर्वात जलदगतीने हा डाव साधत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलनं ४२३ डावात १४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराट कोहलीनं फक्त ४०९ डावात टी-२० क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठत नवा इतिहास रचला आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात हा डाव साधणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १४,००० धावा पूर्ण करणारे फलंदाज

  • विराट कोहली (भारत)  ४०९ डाव
  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)    ४२३ डाव
  • डेविड वॉर्न    (ऑस्ट्रेलिया) ४३१ डाव
  • जोस बटलर (इंग्लंड)  ४६८ डाव
  • ॲलेक्स हेल्स (इंग्लंड)  ५०५ डाव 
  • किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) ६३३ डाव

 
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कुणाच्या नावे?

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने २००५ ते २०२२ दरम्यान ४६३ टी-२० सामने खेळताना १४,५६२ धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ किरॉन पोलार्ड १४,४४९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ ॲलेक्स हेल्स  (१४,४४९ धावा), डेविड वॉर्नर (१४,२८४ धावा) जोस बटलर (१४,२०० धावा) यांच्यानंतर विराट कोहली १४ हजार धावांचा पल्ला गाठणारा सहावा फलंदाज आहे.
 

Web Title : विराट कोहली का शतक, टी20 में बनाया नया विश्व रिकॉर्ड!

Web Summary : रायपुर में केकेआर के खिलाफ विराट कोहली ने अपना 9वां आईपीएल शतक बनाया, और टी20 में 14,000 रन पूरे किए। वे सबसे तेजी से इस मुकाम पर पहुंचने वाले खिलाड़ी हैं, क्रिस गेल को पछाड़कर विश्व रिकॉर्ड बनाया।

Web Title : Virat Kohli's Century Creates New World Record in T20!

Web Summary : Virat Kohli scored his 9th IPL century against KKR in Raipur, achieving 14,000 T20 runs. He's the fastest to reach this milestone, surpassing Chris Gayle and setting a new world record after consecutive zeros.