दुर्मिळ प्राण्याला वाचविण्यासाठी 'या' माणसाने 20 लाख नाकारले; सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 03:46 PM2019-08-26T15:46:16+5:302019-08-26T15:49:52+5:30

जेष्ठ पत्रकार आणि वन्यजीव सामाजिक कार्यकर्ते जयंत दास यांनी एक दुर्मिळ होत असलेल्या पालीची जात टोके गेकोला वाचविण्यात यश मिळविलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे हा प्रकार समोर आला आहे. अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीपासून या दुर्मिळ प्राण्याला वाचविण्यात त्यांना यश आलं. तस्करांनी 20 लाख रुपये देण्याची ऑफर जयंत दास यांना दिली. मात्र जयंत दास यांनी त्याला विरोध केला.

यावर जयंत दास यांनी सांगितले की, 20 लाख रुपयांपेक्षा मला या दुर्मिळ प्राण्याला वाचविण्यात यश आलं त्याचा अभिमान आहे. चीन, कोरिया येथील बाजारांमध्ये या पालीला कोट्यावधीची किंमत आहे. या प्राण्यापासून एचआयव्ही आजार बरा होता असं तेथील लोकांचे मानणं आहे.

टोके गेको हा प्राणी आसाम आणि पुर्वांचल राज्यात आढळणारा प्राणी आहे. याची किंमत 14 कोटी 45 लाखांपर्यंत जाते. चीन, कोरियातील बड्या उद्योजकांकडून या प्राण्याला मागणी आहे. या प्राण्याच्या जीभेपासून तयार होणारं औषध HIV ठीक करतं असं ते म्हणतात.

जयंत दास यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे. लोकांना वन्यप्राण्यांबद्दल आस्था वाढू शकेल अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

टोके गेको ही जात पालींमध्ये आढळून येते. आजारापासून बचाव होण्यासाठी औषध बनविण्यासाठी याचा वापर होतो. दमा, मधुमेह आणि त्वचा रोगांपासून वाचण्यासाठी याचा वापर होतो.