सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही ही मांजर, इन्स्टावर आहेत अडीच लाख फॉलोअर्स, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:43 PM2020-02-06T15:43:44+5:302020-02-06T15:46:40+5:30

सोशल मीडिया कधी कोणाला डोक्यावर घेईल आणि कधी कोणाच्या मागे टीकेचा सपाटा लावेल, याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका मांजरीची फार चर्चा आहे.

बेलारूस असं या मांजरीचं नाव असून तिचं स्वतःचं इंस्टाग्राम अकाऊंट आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर तिचे 2 लाख 50 हजार फॉलोअर्स आहेत. असं काय खास आहे या मांजरीत?

अन्य मांजरीप्रमाणेच दिसणारी ही मांजर सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रेटीलाही मागे टाकेल. त्याला कारण आहे तिचे डोळे.

बेलारूसचे डोळे इतर मांजरींप्रमाणे नाहीत, तर ते तिरपे आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर तिची हवा आहे. इतकंच नव्हे तर ती उत्तम उद्योजकही आहे.

तिच्या चेहऱ्याची प्रतिमा असलेल्या टी-शर्ट्सची प्रचंड मागणी आहे. बेलारूस दोन वर्षांची आहे आणि अमेरिकेतील राचेल क्रॅल ही तिची मालकीण आहे.