बाबो! तरूणींना सुद्धा लाजवेल अशा स्टाईलमध्ये वावरते ही ९२ वर्षाची आजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 04:48 PM2020-02-02T16:48:10+5:302020-02-02T17:07:18+5:30

आपण समाजात वावरत असताना असे अनेक वृध्दमंडळी जे मनाने आणि शरीराने सुद्धा थकलेले असतात. काही वेगळं करण्याची इच्छा त्यांची नसते. एका मर्यादेपलिकडे ते जात नाहीत. राहणीमान अगदी साध, सोपं असतं.

या फोटोमध्ये वेगवेगळ्या स्टाईलसचे कपडे आणि मेकअप करणारी आजी चक्क ९२ वर्षाची आहे. इतकं वय होऊन सुद्धा खूप उत्साहाने ही आजी आपली हौस पूर्ण करत आहे.

या आजीचे ३ मिनियनपेक्षा अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस घालून आणि साजेसा मेकअप करून ही महिला आपले फोटो सोशल मीडियावर टाकत असते.

या आजीचे असे फोटो पाहून अनेकांना जगण्याची उम्मेद येण्यासह सकारात्मक भावना घरातल्या वृध्द महिलांच्या मनात निर्माण होतील.

९० वर्ष पुर्ण झाल्यानंतर केल्या गेलेल्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सुद्धा या दिसत आहेत. सोशल मीडीयावर या आजीच्या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडत असतो.

हेलन रूथ असे या महिलेचे नाव असून तिच्या त्वचेवर खूप सुरकुत्या आहेत. तरीसुद्धा ही आजी खूप एर्नजेटीक दिसून येते.

वन पीस पासून गाऊन, जॅकेट हातांच्या बोटांवर मोजले सुद्धा जाणार नाही एवढ्या प्रकारचे ड्रेस ही आजी घालते.

सध्याच्या तरूणींना सुद्धा मागे टाकणारा या आजीचा हटके, स्टाईलिश लूक आहे.

फक्त कपडेच नाही तर हेअरस्टाईल सुद्धा खूप आकर्षक आहे.