अबब! 90 व्या वर्षी इतके पुलअप्स की जिममध्ये जाणारेही लाजतील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 08:57 AM2019-06-24T08:57:45+5:302019-06-24T11:34:03+5:30

आरोग्य आणि शरीर सदृढ राहण्यासाठी अनेक लोकं जिमचा आधार घेतात. जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करुन घाम गाळतात. जिममधील एक प्रकार म्हणजे पुलअप्स. 90 व्या वर्षी निवृत्त एअर मार्शल पी.व्ही अय्यर यांचा पुलअप्स मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पी.व्ही. अय्यर यांचा पुलअप्स मारतानाचा व्हिडीओ त्यांचा मुलगा परम अय्यरने शेअर केला आहे. परम अय्यर हे स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयाचे सचिव आहेत. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, आमचे वडील आमच्यासाठी स्वस्थ जीवनाचे प्रेरणास्त्रोत आहेत.

निवृत्त एअर मार्शल पी. व्ही. अय्यर यांचा पुलअप्स मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक त्यांचे कौतुक करत पी. व्ही अय्यर यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे संदेश व्हायरल केले जात आहेत.

हा व्हिडीओ परम अय्यर यांनी 2018 मध्ये ट्विट केला होता पण आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय. परम अय्यर यांनी ट्विटमधून असंही सांगितले की, त्यांचे वडील पी.व्ही.अय्यर हे रोज दिवसाला 10 किमी धावतात.

बदलत्या काळानुसार माणसाच्या शरीररचनेत बदल होताना पाहायला मिळत असतो. मात्र आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली तर माणसाला कोणत्याही आजारापासून दूर राहणं शक्य असतं. याच कारणामुळे 90 वर्षीय पी.व्ही अय्यर यांचा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की.