लोक स्वत:हून देतील तुम्हाला मान-आदरानंही बोलतील, ७ गोष्टी करा आणि आत्मविश्वास वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:27 IST2026-04-14T14:37:36+5:302026-04-14T19:27:37+5:30

How To Increase Your Value (7 Pro Tips To Increase Your Value) : जी व्यक्ती स्वत:च्या वेळेची कदर करते. जगही त्याच्या वेळेची कदर करते.

स्वत:ची किंमत आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी तुम्ही स्वत:काम करायला हवं. कोणत्या गोष्टी केल्यानं तुमची किंमत वाढेल ते समजून घेऊ. (How To Increase Your Value)

नेहमी स्वत:ला अपडेट ठेवा. तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल तर लोक तुमचा आदर करतात आणि तुमची किंमत आपोआप वाढते. (How To Increase Self Worth And Know Your Value)

जी व्यक्ती स्वत:च्या वेळेची कदर करते. जगही त्याच्या वेळेची कदर करते. नेहमी वेळेचे पालन करा आणि विनाकारण कोणासाठीही उपलब्ध राहू नका.

शब्दांपेक्षा कृतीवर भर द्या. तुमच्या कामातून तुमची ओळख निर्माण होऊ द्या. फापटपसारा बोलण्याचनं महत्व कमी होतं.

प्रत्येकाच्या प्रत्येक कामाला हो म्हणणं बंद करा. तुमच्या प्राधान्यानुसार गोष्टी निवडा यामुळे तुमची उपलब्धता दुर्मिळ आणि मौल्यवान होईल.

तुमचे व्यक्तीमत्व, पेहराव आणि आरोग्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वत:सा प्रेमानं आणि आदरानं वागवता तेव्हा इतरही तसंच वागतात.

स्वत:च्या निर्णयांवर ठाम राहा. इतरांच्या मतांपेक्षा स्वत:त्या तत्त्वांना जास्त महत्व दिल्यास तुमची किंमत वाढेल.

प्रत्येक गोष्टीत त्वरीत प्रतिक्रीया देणं टाळा. शांत राहून विचारपूर्वक बोलणाऱ्या व्यक्तीची समाजात किंमत जास्त असते.