स्वत:ची प्रतिष्ठा कशी वाढवायची? १० नियम, मानसन्मान मिळेल, लोक कौतुक करतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:21 IST2026-05-15T08:25:26+5:302026-05-15T16:21:17+5:30

How to Increase Your Reputation : कठीण प्रसंगांत डगमगून न जाता संयमानं निर्णय घेणं ही एका प्रतिष्ठीत व्यक्तीची ओळख आहे.

आपली प्रतिष्ठा किंवा समाजात असलेला मान-सन्मान वाढवण्यासाठी काही गोष्टींची पालन करणं गरजेचं आहे.

दिलेला शब्द पाळणं आणि वेळेचं भान राखणं यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो.

लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी नम्रतेनं आणि आदरानं वागावे. सन्मान दिला तरच सन्मान मिळतो.

आपल्या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावर ठेवा आणि स्वतकर्तृत्वाने स्वत:ची ओळख निर्माण करा.

कोणाचीही निंदा, नालस्ती किंवा विनाकारण वादविवाद करणं टाळा.

इतरांच्या अडीअडचणींना धावून जाणं आणि सामाजिक कार्यात हिरीरीनं भाग घेतल्यास प्रतिष्ठा वाढते.

प्रसंगानुरूप नीटनेटका पेहराव आणि समोरच्यावर प्रभाव पडेल असे मोजके पण प्रभावी बोलणे महत्वाचे ठरते.

कोणत्याही कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवल्यास तुमची प्रतिमा उजळते.

कठीण प्रसंगांत डगमगून न जाता संयमानं निर्णय घेणं ही एका प्रतिष्ठीत व्यक्तीची ओळख आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे चारित्र्य आणि तुमची कृती या दोनच गोष्टी समाजात तुमची प्रतिष्ठा ठरवत असतात.