महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58वा वर्धापन दिन रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 11:17 PM2018-05-01T23:17:47+5:302018-05-01T23:17:47+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात पार पडला. (सर्व छायाचित्रं-जयंत धुळप)

अलिबाग येथे पोलिसांनी मैदानावर परेडही केले.

या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

परेड कमांडंट भास्कर महादेव शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या शानदार संचलनात पोलीस दल, होमगार्ड, वज्र पथक, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाश पथक आदी पथकांनी सहभाग दिला.

राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी निरीक्षण वाहनातून परेडचे निरीक्षण केले.