गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:43 IST2026-04-28T12:12:53+5:302026-04-28T12:43:21+5:30
PM Modi Playing Football in Gangtok Photos: गंगटोकच्या तरुण मुला-मुलींसोबत फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटताना मोदींचे फोटो व्हायरल झाले आहेत

PM Modi Playing Football in Gangtok Photos:
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शांत झाली. निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉल खेळताना दिसले.

पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये दाखल झाले. दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी गंगटोकच्या तरुणाईमध्ये फुटबॉलचा आनंद घेताना दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले आणि त्यांनी तरुणांसोबत फुटबॉल खेळले. फुटबॉलच्या मैदानातील फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले.

त्यांनी लिहिले, "गंगटोकच्या सुंदर सकाळी सिक्कीममधील माझ्या तरुण मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखे दुसरे काही असूच शकत नाही."

या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच पंतप्रधान मोदींनी तरुणांशी संवाद साधला.

तरूणाईसोबत फुटबॉल खेळणे आणि त्याचे फोटो शेअर करणे ही पश्चिम बंगालला आकर्षित करण्याची एक रणनीती म्हणूनही पाहिली जात आहे.

पश्चिम बंगाल तसेच सिक्कीममध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे भारतातील क्लब फुटबॉलचे एक प्रमुख केंद्र आहे.

गावपातळीवरही फुटबॉल क्लब अस्तित्वात आहेत. पश्चिम बंगालमधील फुटबॉलची लोकप्रियता इतकी आहे की विश्वचषकावेळी रस्तेवाहतूक ठप्प होते.

निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले, गोल केल्याचा आनंद साजरा केला आणि त्याचे फोटो शेअर केले.

















