नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:51 AM2023-11-27T10:51:29+5:302023-11-27T11:06:04+5:30

नरेंद्र मोदींनी मंदिरात पूजा केली, यासंबंधी फोटो एक्स (ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहेत.

तिरुपती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे तिरुपती बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरात पूजा केली, यासंबंधी फोटो त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले की, '१४० कोटी भारतीयांच्या समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना केली.'

रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचले होते.

त्यावेळी राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचे स्वागत केले.

नरेंद्र मोदी रस्त्याने तिरुमला येथे पोहोचले तेव्हा मार्गात ठिकठिकाणी लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, तिरुमला दौऱ्यानंतर लवकरच नरेंद्र मोदी तेलंगणात पुन्हा प्रचार करणार आहेत. त्यांचा रोड शो दुपारी ४ वाजता सुरू होईल.

याआधी नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता महबूबाबाद आणि दुपारी २ वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील.