PHOTOS : माजी सैनिकाची मुलगी झाली नवज्योतसिंग सिद्धूंची सून; कोण आहे इनायत रंधावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 04:39 PM2023-12-08T16:39:39+5:302023-12-08T16:42:24+5:30

इनायत रंधावाला काश्मीरशी संबंधित कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते.

पंजाबमधील प्रसिद्ध नाव असलेले माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू विवाहबंधनात अडकला. गुरूवारी त्याने इनायत रंधावासोबत सातफेरे घेतले.

पटियाला येथील नवज्योत सिंग सिद्धूंच्या घरी करण सिद्धूचे इनायत रंधावासोबत लग्न झाल्यानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

तेथील नामांकित नीमराना हॉटेलमध्ये हे रिसेप्शन झाले. या कार्यक्रमाला राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक व्यक्तींनी हजेरी लावल्याचे कळते.

सिद्धू यांनी मुलाच्या लग्नाची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. सिद्धू यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवज्योत सिंग सिद्धू, करण सिद्धू आणि वधू इनायत रंधावा दिसत आहे.

या वर्षी जूनमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी इनायत रंधावाची ओळख करून दिली होती.

इनायत ही पटियाला येथील रहिवासी आहे. पटियालामधील प्रसिद्ध नाव असलेल्या मनिंदर रंधावा यांची ती मुलगी आहे. त्यांनी सैन्यात सेवा बजावली आहे.

इनायत रंधावाला काश्मीरशी संबंधित कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. करण सिद्धूबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो पेशाने वकील आहे.

करणने एमिटी विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच न्यूयॉर्कमधील बेंजामिन एन. कार्डोझो स्कूल ऑफ लॉमधून मास्टर ऑफ लॉ पदवी प्राप्त केली.