नागपुरातही बुद्ध पोर्णिमा उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:22 PM2018-04-30T21:22:16+5:302018-04-30T21:22:50+5:30

बुद्ध पोर्णिमेनिमित्त दीक्षाभूमी येथील मध्यवर्ती स्मारक आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. यासोबतच दीक्षाभूमी परिसरातील ऐतिहासिक बोधीवृक्षाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बोधीवृक्षावरही रोषणाई करण्यात आली होती.

बुद्ध पोर्णिमेनिमित्त दीक्षाभूमी येथे सामुहिक वैशाख पोर्णिमा समारोह आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी उपासकांना धम्मदेसना देतांना भदंत विमलकित्ती गुणसिरी

बोरगाव येथील पावा बुद्ध विहार येथे उपासक-उपासिकांना धम्मदेसना देतांना भदंत नागदीपंकर महाथेरो.

बुद्ध पोर्णिमेनिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेला अभिवादन करतांना राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे

दीक्षाभूमी परिसरात बुद्ध प्रतिमा न्याहाळतांना बौद्ध भगीनी