'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:59 IST2026-05-19T10:12:41+5:302026-05-19T10:59:01+5:30

भूमिका चावलाने मोठी पोस्ट शेअर करत ती नक्की कुठे कमी पडली याचंही कारण सांगितलं

actress bhumika chawla shares her 25 years experience also accepts she lack in pr marketing | 'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?

'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?

'तेरे नाम'मधून निर्जरा या भूमिकेतून सर्वांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री भूमिका चावला आठवतेय? आज तिला ओळखणंही कठीण आहे. काही सिनेमांमध्ये ती छोट्या छोट्या भूमिकेत दिसते. 'एम एस धोनी'मध्ये ती धोनीच्या आईच्या भूमिकेत होती. नुकतंच भूमिकाने तिच्या करिअरमधील डाऊनफॉलवर भाष्य केलं. 'पीआर मार्केटिंगमध्ये मी कमी पडले' असं तिने स्पष्ट केलं.

भूमिका चावलाला नुकताच एक अवॉर्ड मिळाला. आईवडील, चाहते आणि स्वत:चेही  आभार व्यक्त करत तिने लिहिले, "२५ वर्ष... आणि कितीतरी वेगवेगळे अनुभव. जेव्हा मी वळून पाठीमागे पाहते, तेव्हा भूतकाळाच्या आरशात सगळं काही धूसर दिसतं... आणि तरीही, सर्व काही तितकंच स्पष्ट आहे...

माझे सर्व दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ, डीओपी, लेखक, स्टायलिस्ट, सहाय्यक दिग्दर्शक आणि थोडक्यात सांगायचं तर या प्रवासातील संपूर्ण टीमचे मनापासून आभार.

थँक्यू आई (तू नेहमीच माझा खंबीर पाठींबा म्हणून माझ्यासोबत होतीस) आणि आज मला जाणीव होतेय की तू किती शांत, प्रतिष्ठित आणि माझी खरी ताकद होतीस. पहिल्या चित्रपटाच्या वेळी काहीच समजत नसल्यामुळे पळून जाण्याची इच्छा असणाऱ्या त्या लहान मुलीला, 'आपण गोष्टींमधून पळ काढायचा नसतो, तर तिथे पाय रोवून उभं राहायचं असतं आणि ते काम पूर्ण करायचं असतं, त्यानंतरही जर तुला ते पुढे करायचं नसेल तर तू खुशाल सोडू शकतेस' हे समजावून सांगण्यासाठी तुझे खूप खूप आभार! 
थँक्यू पापा 
थँक्यू माझा छोटा चॅम्पियन... मला इतक्या गोष्टींसाठी प्रेरित आणि प्रोत्साहित केल्याबद्दल 

थँक्यू भूमिका (ती लहान भूमिका)
जिने या प्रवासाची सुरुवात केली आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत ती पुढे जात राहिली; ते निर्णय योग्य असतील किंवा चुकीचे, पण ते पूर्णपणे माझे स्वतःचे होते.कधीही हार न मानल्याबद्दल तुझे आभार... होय,
तू कदाचित इतरांसारखी ठरावीक साच्यातली, खूप सुंदर नसशील, किंवा तुझ्या क्षेत्रातील सर्वोत्तम नसशील,
पण तू तुझ्या कामाशी नेहमीच प्रामाणिक आणि समर्पित राहिलीस. स्वतः यशाची शिडी चढण्यासाठी तू कधीही कोणाला खाली खेचले नाहीस. तू पीआर, मार्केटिंग आणि इतर अनेक गोष्टींमध्ये आणखी चांगली कामगिरी करू शकली असतीस..असो, या कलेबद्दल, अभिनयाबद्दल आणि हा बिझनेस कसा चालतो याबद्दल अजूनही बरंच काही शिकणं आणि समजून घेणं बाकी आहे...


प्रिय मुली,

तुला तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आरोग्याची आणि मनाच्या शांततेची काळजी घे. माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार. तुम्हीही तुमच्या आरोग्याची आणि मनाच्या शांततेची काळजी घ्या, कारण शेवटी या जगात तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी, माझ्या या संपूर्ण प्रवासात नेहमी सोबत राहिल्याबद्दल माझे प्रिय कुटुंब आणि मित्रांचे खूप खूप आभार."

Web Title : 'तेरे नाम' की निर्जरा आज भी सुंदर, करियर पर चिंतन; कहाँ हुई चूक?

Web Summary : 'तेरे नाम' से मशहूर भूमिका चावला अपने 25 साल के करियर पर विचार करती हैं। वह पीआर और मार्केटिंग में कमियों को स्वीकार करती हैं, फिर भी उन्हें परिवार और प्रशंसकों का समर्थन मिला। वह अपनी यात्रा और सीखों को संजोती हैं।

Web Title : 'Tere Naam' Nirjara looks beautiful, reflects on career; where did she falter?

Web Summary : Bhumika Chawla, famed for 'Tere Naam,' reflects on her 25-year career. She acknowledges shortcomings in PR and marketing, despite support from family and fans. She treasures her journey and lessons learned.