PHOTO : "साहेबांनी भाकरी फिरवली अन् दादांनी...", अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 06:08 PM2023-07-02T18:08:40+5:302023-07-02T18:14:20+5:30

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली.

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली. त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. नेटकरी राजकीय घडामोडीवर भाष्य करताना राजकारण्यांची खिल्ली उडवत आहेत.

अनेकांनी मतदान कार्ड विकणे आहे, असं म्हणत निवडणुकीचे महत्त्व काय उरले आहे आणि त्याची कशी थट्टा सुरू आहे हे मिश्किलपणे सांगितले. आमच्या मताला किंमत नसल्याचा सूर नेटकऱ्यांमध्ये आहे.

अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे नेते आज सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांना धक्का बसला.

नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मंडळींची खिल्ली उडवत आहेत. काहींनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे फोटो पोस्ट केले आहेत.

तर अजित पवार पहाटे आणि दुपारी देखील झोपू देत नसल्याचे मिश्किलपणे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अनेकांनी संजय राऊत यांच्या जुन्या व्हिडीओ व्हायरल करत त्यांची फिरकी घेतली.

काहींनी स्कॅम २०२३ असा पोस्टर झळकावून अजित दादांच्या स्वॅगचा भन्नाट उल्लेख केला.

तसेच भविष्यात भाजप आणि कॉंग्रेस हे पक्ष देखील एकत्र आले तर नवल वाटायला नको असे अनेकांनी म्हटले आहे.

आजच्या शपथविधीवरून व्हायरल होणारे भन्नाट मीम्स नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहेत.