पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 10:48 AM2019-07-18T10:48:52+5:302019-07-18T10:56:53+5:30

चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याआधी म्हणजेच 18 जुलै 1969 ला नासाच्या यानाने चंद्राकडे झेप घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षाला नासाने रोमांचकारी असे 400 फोटो प्रसिद्ध केले आहेत. यातील काही फोटो आर्श्चकारक आहेत.

चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? नील आर्मस्ट्राँग ने. पण या नील आर्मस्ट्राँगसोबत आणखी दोघेजण या मोहिमेवर होते.

आर्मस्ट्राँग यांनी पहिले पाऊल ठेवले पण दुसरे पाऊल कोणी ठेवले याबाबत माहिती नसेल. या व्यक्तीचे नाव होते. एल्ड्रिन. चंद्रावर पाऊल ठेवतानाचा फोटो आर्मस्ट्राँगॉचा नाही तर एल्ड्रिन यांचा आहे. कारण तेव्हा आर्मस्ट्रॉन्गच कॅमेरा हाताळत होते.

पन्नास वर्षांपूर्वी कोणता कॅमेरा होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तेव्हाच्या उच्च दर्जाचा हेजेलब्लाद कॅमेरामधून हे फोटो काढण्यात आले आहेत. हे कॅमेरे स्वीडनमध्ये बनविले जातात. एल्ड्रिन यांच्या पावलाचे ठसे आजही चंद्रावर आहेत. कारण तेथे वायूमंडळ नाही तसेच पाऊसही पडत नाही.

अशा प्रकारचे अन्य फोटो मार्च 1969 मध्ये घेण्यात आलेले अपोलो-9 चे फोटो आहेत. यामध्ये अंतराळात यान पृथ्वीभोवती फिरत आहे आणि अंतराळवीर डेव स्कॉट खिडकीतून बाहेर पडून पृथ्वीकडे पाहत आहेत.

सुरूवातीला फोटोग्राफी नासाच्या विचारात नव्हती. मात्र, जेव्हा अंतराळवीरांनी हेजेलब्लाद कॅमेरा घेऊन जाण्यास सुरुवात केली तेव्हापासून फोटो काढण्यास सुरूवात झाली.

यानंतर 1972 मध्ये अपोलो 17 यानाने चंद्रावर पुन्हा पाऊल ठेवले होते. यावेळी अंतराळातून पृथ्वीचा विहंगम फोटो घेण्यात आला होता. रंगीत कॅमेरामुळे या फोटोला ब्ल्यू मार्बल असे नाव पडले.

जेव्हा अंतराळवीराचा चंद्रावर चालताना तोल गेला तेव्हाचा फोटो.

नासाच्या नियंत्रण कक्षातून यानाशी संपर्क साधता येणारी यंत्रणा