पावसाच्या स्वागताला गोव्यात चिखलकाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 10:50 PM2019-07-13T22:50:15+5:302019-07-13T22:53:46+5:30

गोव्यात माशेल (जि. उत्तर गोवा) गावामध्ये दरवर्षी पावसाळ्य़ात चिखलकाला साजरा केला जातो. ( सर्व छायाचित्रे : यदुवीर कुंडईकर)

पाऊस कोसळत असतो. सर्वत्र पाणी-पाणी झालेले असते. अनेक ठिकाणी चिखल साचलेला असतो.

लोक कोसळणा-या पावसाचे नाचून, गाऊन आणि अनेक खेळ खेळत जल्लोषी स्वागत करतात.

अनेक लोक काही पारंपरिक खाद्यपदार्थ घरातून करून आणून तेथे वाटतात.

विशेष म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठांर्पयत सर्वजण पावसाच्या स्वागतात तल्लीन झालेले असतात.