तन्वी बोलते सबको कोलते! 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी, सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणारी ही आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:36 IST2026-01-16T16:30:35+5:302026-01-16T16:36:06+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात राडा करणारी ही तन्वी कोलते नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी ६च्या पहिल्याच आठवड्यात घरात जोरदार वाद होताना दिसत आहेत. तन्वी कोलते हिने टास्कदरम्यान सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवलं.

"तुला वाटतं तू कॉमेडी करतो?" असं तन्वीने म्हटल्यानंतर सागरचाही पारा चढला. याआधीही तन्वीने सागरला अरे तुरे करत त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता.

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच तन्वीने अख्खं घर डोक्यावर घेतलं आहे. पहिल्याच दिवशी ती रुचितासोबत भांडली होती. नंतर दिपाली सय्यदसोबत तिचं वाजलं.

कायम मोठ्या आवाजात बोलणारी आणि तलवार काढून भांडणासाठी तयार असलेल्या तन्वीला ट्रोल केलं जात आहे.

पण बिग बॉस मराठीच्या घरात राडा करणारी ही तन्वी कोलते नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.

तन्वी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २७ वर्षांच्या तन्वीने मिस गोवा २०२० आणि मिस रत्नागिरी २०१८ हे खिताब जिंकले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

तन्वी सोशल मीडियावर सक्रिय असून ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवताना दिसते. तिचे इन्स्टाग्रामवर ८५.९ हजार फॉलोवर्स आहेत.

सागर कारंडेला त्याच्या कॉमेडीवरुन हिणवल्याने तन्वी सध्या ट्रोल होत आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश तन्वीला खडे बोल सुनावणार का हे पाहावं लागेल.

















