शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 08:47 IST

1 / 7
Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये सध्या घसरण पाहायला मिळत असली, तरी काही शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. असाच एक शेअर म्हणजे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड (Cholamandalam Investment and Finance Company Ltd).
2 / 7
या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः कोट्यधीश बनवलं आहे. एकेकाळी या शेअरची किंमत १० रुपयांपेक्षाही कमी होती, जी आता १६०० रुपयांच्या पुढे गेली आहे.
3 / 7
चोलामंडलमच्या शेअरमध्ये मंगळवारीही तेजी पाहायला मिळाली. सोमवारी हा शेअर १,६३८.३० रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी तो वाढीसह उघडला. व्यवहारादरम्यान या शेअरनं १,६६६ रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर १,६२४ रुपयांच्या नीचांकी पातळीलाही स्पर्श केला. अखेर १.१२% च्या वाढीसह हा शेअर १,६५६.६० रुपयांवर बंद झाला.
4 / 7
गेल्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे १९% इतका जबरदस्त परतावा दिला आहे. तर २०२६ या वर्षाचा विचार केला तर या शेअरमध्ये सुमारे ४% घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षातील परतावा समाधानकारक राहिलेला नाही, यात केवळ ७% वाढ झाली आहे.
5 / 7
या शेअरने गेल्या १६ वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. मार्च २०१० मध्ये या शेअरची किंमत केवळ १६.३७ रुपये होती. आता ती १,६५६.६० रुपयांवर पोहोचली आहे. अशा प्रकारे, या १६ वर्षांत शेअरनं १०,०००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं १६ वर्षांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक झालं असतं.
6 / 7
जर आपण अधिक दीर्घकाळाचा विचार केला, तर या शेअरनं दिलेला परतावा थक्क करणारा आहे. जानेवारी १९९९ मध्ये या शेअरची किंमत फक्त ५.२८ रुपये होती, म्हणजेच १० रुपयांपेक्षाही कमी. आता ही किंमत १,६५६.६० रुपये झाली आहे. म्हणजेच या २७ वर्षांत गुंतवणूकदारांना ३१,०००% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. याचाच अर्थ, २७ वर्षांपूर्वी केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे.
7 / 7
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा