मुंबई : ये राते ये मौसम नदी का किनारा, जांभूळ पिकल्या झाडाखाली, लग जा गले के फिर... अशी एकाहून एक सरस गाणी एरवी अतिशय रूक्ष वातावरण अनुभवणाऱ्या मंत्रालयात मंगळवारी कामाच्या वेळात ऐकायला मिळाली.
मंत्रालय म्हटले की, शुद्ध सरकारी वातावरण बघायला मिळते. फायलींच्या ढिगापलीकडे बसलेले कर्मचारी, अधिकारी, टिपिकल सरकारी धाटणीची उत्तरे देण्याची त्यांची पद्धत असे कंटाळवाणे वातावरण असते, पण मंगळवारची दुपार आणि सायंकाळ मधुर गाणी घेऊन आली होती.
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
काही अचंबित तर काहींच्या तिखट प्रतिक्रिया
मंत्रालयात कामासाठी आलेले लोक मात्र या गाणे-बजावण्यामुळे अचंबित झाले. कामाच्या वेळेत गाणे कशासाठी, असा प्रश्न काहींना पडला. सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम झाला असता, अशा काही प्रतिक्रिया आल्या.
गाण्यांचा गारव्यात अधिकारी न्हाऊन निघाले
मंगळवार हा मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस, या दिवशी तर खूपच जास्त गर्दी असते. मात्र, आज मंत्रिमंडळाची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर होती आणि मंत्रालय सुप्रसिद्ध गायिका, गीत-संगीताच्या गाढ्या अभ्यासक डॉ.मृदुला दाढे व त्यांच्या चमूने सादर केलेल्या गाण्यांमध्ये न्हाऊन निघाले.
घामटा काढणारे ऊन मी म्हणत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना गाण्यांचा गारवा अनुभवायला मिळाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील मधल्या मोकळ्या जागेत (त्रिमूर्ती) हा कार्यक्रम झाला.
आगळा-वेगळा असा ‘टेक-वारी’ उपक्रम
सामान्य प्रशासन विभागाने सध्या ‘टेक-वारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना तणावमुक्त वातावरणात काम करता यावे, म्हणून कला, संगीत, योगासने, ध्यानधारणा आदींचे सादरीकरण व प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे.
सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष तर जवळपास नऊ लाख कर्मचारी हे ऑनलाइन सहभागी झाले आहेत. त्या अंतर्गतच आजचा ‘रहे ना रहे हम’ हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम ४ वाजता सुरू होऊन साडेपाचला संपला.
Web Summary : Mantralaya experienced a musical interlude during work hours. Employees enjoyed songs presented by Dr. Mridula Dadhe's team. This 'Take-Wari' initiative aims to reduce stress through arts, music, yoga, and meditation for employees; part of a stress-relief program.
Web Summary : मंत्रालय में काम के घंटों के दौरान संगीतमय माहौल बना। कर्मचारियों ने डॉ. मृदुला दाढे की टीम द्वारा प्रस्तुत गीतों का आनंद लिया। 'टेक-वारी' पहल का उद्देश्य कला, संगीत, योग और ध्यान के माध्यम से तनाव कम करना है।