पुणे : नसरापूर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि खूनप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. यासाठी न्यायालयात फिर्यादी पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधि आणि न्याय विभागाला पाठविला आहे.
प्रस्तावात तीन वकिलांची नावे पोलिसांनी सुचविली आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती करण्यात येईल, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
नराधमाने ओरडू नये म्हणून तोंडात पायमोजा कोंबला
नसरापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने ती ओरडू नये म्हणून मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, तसेच झटापटीत पीडितेच्या छातीवर वळ उमटल्याचे शवविच्छेदनात निदर्शनास आले आहे.
ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत.
तपासणीचा अहवाल सादर करण्याची सूचना
ससून रुग्णालयात या प्रकरणातील आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे.
Web Summary : Outrage follows the Nasrapur sexual assault and murder. A special public prosecutor is being considered. The accused is remanded in police custody until May 7. The victim had a sock stuffed in her mouth and chest wounds.
Web Summary : नसरापुर यौन उत्पीड़न और हत्या के बाद आक्रोश। एक विशेष लोक अभियोजक पर विचार किया जा रहा है। आरोपी 7 मई तक पुलिस हिरासत में। पीड़िता के मुंह में मोजा ठूंसा हुआ था और छाती पर घाव थे।