शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 23:16 IST

West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगालमधील भाजपा विजयाची कीर्ती अमेरिकेत पोहोचली असून, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या या विजयाची चर्चा जगभरात होत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनीही पंतप्रधान मोदी यांना या ऐतिहासिक विजयाबाबत शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. 

पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपप्रणित रालोआशासित राज्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यामुळे भाजपासाठी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरन मांझी यांना सह-पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

असा नेता लाभला आहे, हे भारताचे भाग्य आहे

व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांच्या ऐतिहासिक आणि निर्णायक निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि म्हटले होते की, भारताला असा नेता लाभला आहे, हे भारताचे भाग्य आहे, असेही व्हाइट हाऊसने नमूद करत सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील भाजपाचा विजय हा दीर्घकाळ तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यातील पहिला विजय आहे. या निवडणुकीच्या निकालांमुळे ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला असून, पंतप्रधान मोदींसाठी हे एक मोठे राजकीय यश मानले जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Congratulates Modi on Landmark West Bengal Victory: A Lucky Leader!

Web Summary : Trump congratulated Modi on BJP's West Bengal win, ending Banerjee's 15-year rule. BJP now governs 22 states. Amit Shah oversees leader selection. Trump praised Modi as India's fortune.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा