शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 23:43 IST

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, रात्री उशीरापर्यंत घटनेचा तपास सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : चाकण आणि नसरापूरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर आजोबांनीच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.५) पर्वती परिसरात घडली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना कळल्यानंतर जमावाने रस्ता रोको करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, रात्री उशीरापर्यंत घटनेचा तपास सुरू होता. नागरिकांचे पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु होते.  

आरोपी हा अल्पवयीन मुलीचा आजोबा असून, पीडित मुलगी आरोपीच्या मुलीची मुलगी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. मंगळवारी आरोपी मुलीला एका खोलीत घेऊन गेला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर तेथील महिलांना संशय आल्याने त्या दरवाजा उघडून खोलीत गेल्या. तेव्हा मुलीचे कपडे काढल्याचे दिसले. नागरिकांनी आरोपीला चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र परिसरात तणावाचे वातावारण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका ५४ वर्षीय नराधम आजोबाने आपल्या अवघ्या ३ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यांनतर नसरापूर येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण घडले. चाकण मध्येही तीन वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केला. या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा पुण्यात आजोबाच्या विकृत कृत्याने संतापाची लाट उसळली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Grandpa Attempts Assault on Minor; Citizens Avert Tragedy

Web Summary : In Pune, a grandfather allegedly attempted to sexually assault his granddaughter. Alert citizens intervened, preventing further harm. The incident sparked outrage, leading to protests. Police have arrested the accused, and an investigation is underway amidst public outcry, adding to a series of similar heinous crimes in Maharashtra.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस