Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)

समीर रिझवीची इम्पॅक्टफुल खेळी

By सुशांत जाधव | Updated: May 5, 2026 22:41 IST

Open in App

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील घरच्या मैदानात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फंदाजी करण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा निर्णय फसला. अर्धा संघ ६९ धावांत तंबूत परतल्यावर इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या समीर रिझवीनं नाबाद ४० धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर १५५ धावा लावल्या. या सामन्यातील अखेरच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि जलदगती गोलंदाज जेमी ओवर्टन यांच्यात चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्या ताळमेळाच्या अभावामुळे समीर रिझवीला जीवनदान मिळाले. चेन्नईकरांनी सोपा झेल सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 नेमकं काय घडलं?  सोपा झेल कसा सुटला?

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १९ व्या षटकात जेमी ओवर्टन गोलंदाजीला आला. पहिल्या दोन चेंडूवर त्याने प्रत्येकी एक एक धाव खर्च केली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या समीर रिझवीने मोठा फटका खेळला. पण चेंडू बॅटची कड घेऊन उंच हवेत उडाला. पण चेन्नईकरांना या विकेटचा डाव साधता आला नाही. जेमी आपल्याच गोलंदाजीवर कॅच घेण्यासाठी गेला. पण त्याचा अंदाज चुकला. दुसरीकडे ऋतुराज त्याच्यावर भरवसा ठेवून जागेवरच थांबला. परिणामी दोघेही कॅच न घेता चेंडूकडे बघत बसले. 

चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"

समीर रिझवीची इम्पॅक्टफुल खेळी

समीर रिझवीनं हा झेल सुटल्यावर आपल्या खात्यात ७ धावांची भर घातली.  दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने २४ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावांची सर्वोच्च खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्स याने केलेल्या ३१ चेंडूतील ३८ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. 

English
हिंदी सारांश
Web Title : CSK's dropped catch gives Rizvi a life; costly error?

Web Summary : Delhi Capitals struggled, but Sameer Rizvi's unbeaten 40 helped them reach 155. A dropped catch by CSK, due to confusion between Gaikwad and Overton, gifted Rizvi a crucial lifeline, impacting the game's momentum.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाड