चंडीगड : हैदराबादहून चंडीगडला आलेल्या इंडिगोच्या ६ई १०८ विमानात मंगळवारी पॉवर बँकचा स्फोट झाला. यात ५ प्रवासी जखमी झाले. ही पॉवर बँक एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेली होती.
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
विमानतळावर हे विमान उतरल्यावर ही घटना घडली. स्फोटानंतर केबिनमध्ये धूर पसरला व प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. क्रू मेंबर्सनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व प्रवाशांना आपत्कालीन प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. (वृत्तसंस्था)
स्फोट कशामुळे?
पॉवर बँकचा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि विमानतळ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या प्रवाशाने ती पॉवर बँक वापरत असताना सलग अडीच तास मोबाइलवर सिनेमे पाहिले होते.
सर्व प्रवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविले
सर्व प्रवाशांना तातडीने विमानाच्या बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच संबंधित सर्व यंत्रणांना त्वरित माहिती देण्यात आली.
मी, माझी पत्नी कोमल आणि आठ वर्षांचा मुलगा नमन याच विमानात होतो. धूर येऊ लागला तेव्हा धावपळ उडाली. धावपळीत अनेक पडले, जखमी झाले. सुदैवाने हे विमान काही मिनिटांआधीच चंडीगडला लँड झाले होते. त्यामुळे आम्ही वाचलो. हे जर विमान हवेत असताना घडले असते तर अनर्थ घडला असता. एका मोठी दुर्घटना होण्यापूर्वी आम्ही वाचलो, हे आमचे सुदैव.
रोशन राजेंद्र छाजेड, छत्रपती संभाजीनगर
Web Summary : A power bank exploded on an IndiGo flight from Hyderabad to Chandigarh, injuring five passengers. The explosion caused smoke and panic after landing. Crew members quickly controlled the situation, evacuating passengers. The cause is under investigation, with witnesses reporting heavy power bank usage.
Web Summary : हैदराबाद से चंडीगढ़ जा रही इंडिगो की उड़ान में एक पावर बैंक फट गया, जिससे पाँच यात्री घायल हो गए। लैंडिंग के बाद विस्फोट से धुआं और दहशत फैल गई। चालक दल के सदस्यों ने तुरंत स्थिति को नियंत्रित किया और यात्रियों को निकाला। कारण की जांच चल रही है।