शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 05:24 IST

प्रकरणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तलावात भरती-ओहोटीचे पाणी नैसर्गिकरीत्या प्रवाहित होईल याची खात्री करा आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचा विचार करून विकास आराखड्यात बदल करा, असे स्पष्ट निर्देश सिडकोला देण्यात आले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईतील डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय हरित लवादाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवादाने नियुक्त केलेल्या संयुक्त तपासणी समितीने सिडकोला दोन महिन्याची डेडलाईन देत या

प्रकरणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तलावात भरती-ओहोटीचे पाणी नैसर्गिकरीत्या प्रवाहित होईल याची खात्री करा आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचा विचार करून विकास आराखड्यात बदल करा, असे स्पष्ट निर्देश सिडकोला देण्यात आले आहेत.

समितीने नवी मुंबई महापालिकेलाही फ्लेमिंगो अधिवास जपण्यासाठी आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करण्यास सांगितले आहे. २८ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार, पक्षी विषयातील तज्ज्ञ संस्थेकडून अभ्यास करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

...तर न्यायालयाचा अवमान

नॅटकनेक्ट फाउंडेशनने या प्रकरणी राज्य पाणथळ प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. कुमार यांनी सांगितले की, “पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्याचे आदेश असताना त्याचे पालन झालेले नाही. हा प्रकार न्यायालयाचा अवमान ठरू शकतो.” यापूर्वीच या क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा देण्याची शिफारस केली होती.

फ्लेमिंगोंच्या मृत्यूमुळे प्रकरण गाजले

गेल्या वर्षी तलावात सात फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळल्याने हे प्रकरण पुढे आले. त्यानंतर हरित लवादाने स्वतःहून दखल घेऊन संयुक्त समिती नेमली होती. या समितीत वन विभाग, पाणथळ प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिका आणि सिडकोचे अधिकारी सहभागी होते.

हरित लवादाचे आदेश बंधनकारक

हरित लवाद हा पर्यावरण विषयांवरील अर्ध-न्यायालयीन मंच असतो. यामुळे त्याचे आदेश कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असतात. त्याकडे दुर्लक्ष करणे प्रशासन किंवा संस्थांसाठी धोकादायक ठरू शकते.

 केंद्र-राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सिडकोसारख्या संस्थांना ते पाळणे बंधनकारक आहेत. हे अधिकार हरित लवाद कायदा २०१० अंतर्गत दिलेले आहेत. फ्लेमिंगो तलाव तक्रारीसारख्या प्रकरणात भरती-ओहोटीचा प्रवाह सुरू ठेवण्याचे आदेश बंधनकारक आहेत.

आदेश न पाळल्यास सिडको/महापालिकेवर मोठा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाईसह प्रकल्प/कामे थांबविण्याचे आदेश लवाद देऊ शकतो. आदेश जाणीवपूर्वक न पाळल्यास ‘न्यायालयाचा अवमान’ मानला जातो. हरित लवादाला थेट अवमान अधिकार मर्यादित असले, तरी प्रकरण पुढे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Flamingo Lake Conservation: CIDCO Given Deadline; Report in Two Months

Web Summary : National Green Tribunal sets deadline for CIDCO to conserve Flamingo Lake. Ensure tidal flow, alter development plans for birds. Report due in two months; non-compliance risks penalties.