शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:18 IST

West Bengal Election Post Result Violence: कोलकाता येथील न्यू मार्केट परिसरात टीएमसी युनियन कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. वाचा सविस्तर.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मध्य कोलकात्यातील ऐतिहासिक हॉग मार्केट (न्यू मार्केट) परिसरात मंगळवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या (TMC) युनियन कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. "कोलकात्याच्या ऐतिहासिक न्यू मार्केटमध्ये भाजपचे 'परिवर्तन' बुलडोझरसह आले आहे," असा टोला मोइत्रा यांनी लगावला. डेरेक ओब्रायन यांनी असा दावा केला की, पोलिसांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय दलांच्या देखरेखीखाली ही तोडफोड करण्यात आली. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मांसाच्या दुकानांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्थानिकांचा वेगळाच दावा; अनधिकृत बांधकामाचा पेचएकीकडे राजकीय आरोप होत असताना, स्थानिक रहिवासी आणि काही व्यापाऱ्यांनी मात्र टीएमसीचे दावे फेटाळून लावले आहेत. स्थानिकांच्या मते, ज्या वास्तूवर बुलडोझर चालवण्यात आला, ती मुळात एका दुकानदाराकडून बळकावलेली जागा होती आणि तिथे अनधिकृतपणे युनियनचे कार्यालय थाटण्यात आले होते. ज्याला 'मांसाचे दुकान' म्हटले जात आहे, ती जागा प्रत्यक्षात तशी नव्हती, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाचा 'झिरो टॉलरेंस'चा आदेशघटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक आयोगाने कडक पावले उचलली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निवडणूक पश्चात हिंसाचाराबाबत 'झिरो टॉलरेंस' धोरण राबवण्याचे आदेश दिले आहेत. हिंसाचार भडकवणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आले असून, न्यू मार्केट परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: TMC office demolished in Hog Market, tensions rise.

Web Summary : Post-election violence in West Bengal escalated as a TMC office in Kolkata's Hog Market was bulldozed. While TMC leaders blame BJP, locals claim it was an unauthorized structure. Election Commission orders zero tolerance against violence.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2026West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा