आपल्याला अमुक भाषा शिकायची असते, बॉडीबिल्डिंग करायचं असतं, फिरायला जायचं असतं, नवीन पदार्थ शिकायचे असतात, मित्रांशी गप्पा मारायच्या असतात, घर आवरायचं असतं.. पण आपण करत नाही. का? कारण आपल्याला वेळच नसतो.. कुठं जातो आपला वेळ? का जातो? ...
बुलढाणा जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात मी स्थलांतर केलं. वय वर्षे १५. तेव्हा कळलं पाणीप्रश्न काय असतो ते. वीस दिवस पाणी यायचं नाही, १०-१० दिवस अंघोळ नाही, खाण्याचे हाल. पण तरी तगलो..कारण जगण्याची ऊर्मी साऱ्याला पुरून उरते.. ...