आपल्याला काय काय थोर्थोर वाटतं, शाळेत निबंधात लिहितो तसं, मी देश बदलवून टाकेल, मी मोठा मंत्री होईल, मी क्रांती करेल, मी खूप श्रीमंत होईल, मी यंव करीन, त्यंव करीन. पण ते कसं करशील असं कुणी विचारलं तर? तोंडाला कुलूप?? ...
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न ...
मुलं शाळेतून येतात, कॉलेजातून येतात, दप्तर फेकतात आणि मस्त मैदानावर खेळायला जातात. त्यांना त्या खेळात करिअर करायचं नसतं, फक्त खेळायचं असतं! तसं मुली का खेळत नाहीत? मैदानावर बिन्धास्त खेळण्यात प्रॉब्लेम काय आहे? ...