शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अंघोळीसाठी गेली, पण परत आलीच नाही! तासभर वाट पाहून पतीने दरवाजा तोडला, आत भीषण दृश्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:31 IST

अंघोळीसाठी गेलेली एक ३५ वर्षीय महिला तब्बल एक तास बाहेर न आल्याने पतीने दरवाजा तोडला असता, ती बेशुद्धावस्थेत आढळली.

थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक असले तरी, निष्काळजीपणाने वापरलेला गॅस गीझर किती जीवघेणा ठरू शकतो, याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे उघडकीस आली आहे. अंघोळीसाठी गेलेली एक ३५ वर्षीय महिला तब्बल एक तास बाहेर न आल्याने पतीने दरवाजा तोडला असता, ती बेशुद्धावस्थेत आढळली. गीझरमधून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे श्वास गुदमरून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

गीझरचा वापर करताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास होणारे गंभीर परिणाम या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. मुजफ्फरनगर येथे कॉस्मेटिक व्यापारी असलेले गौरव बंसल यांची पत्नी वर्षा बंसल (वय ३५) यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता वर्षा अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी गौरव हे बाहेर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, तर त्यांची आई आणि तीन मुले घरी झोपलेली होती.

दरवाजा तोडला, पण खूप उशीर झाला होता!

गौरव सुमारे एक तासानंतर घरी परतले. त्यावेळी त्यांनी पाहिले की, वर्षा अजूनही बाथरूममधून बाहेर आली नव्हती. बराच वेळ झाल्याने त्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि वर्षाला आवाज दिला, पण आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्याने गौरव घाबरले आणि त्यांनी तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडला. आतमध्ये पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. वर्षा बेसुद्धावस्थेत जमिनीवर पडलेली होती.

विषारी वायू ठरला मृत्यूचे कारण

गॅस गीझर सतत चालू असल्याने, त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे वर्षा यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. गौरव यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तपासणी करून वर्षा यांना मृत घोषित केले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गीझरमधून कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड हे वायू बाहेर पडतात. जिल्हा रुग्णालयाचे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. योगेंद्र त्रिखा यांनी सांगितले की, जर बाथरूममध्ये हवा खेळती राहण्याची योग्य व्यवस्था नसेल, तर हे वायू श्वासातून शरीरात जाऊन गुदमरल्याने मृत्यू ओढवतो.

गौरव आणि वर्षा यांना १५ वर्षांचा राघव, १२ वर्षांचा अथर्व आणि ७ वर्षांचा वंश असे तीन मुले आहेत. आईच्या अचानक जाण्याने या तिन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कुटुंबावर आघात झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू