शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:31 IST

Prateek Yadav : प्रतीक यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत जिममध्ये असणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, प्रतीक आपल्या फिटनेसची खूप काळजी घ्यायचे आणि सर्वांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागायचे.

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक यादव यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते असं सांगितलं जात आहे. प्रतीक यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत जिममध्ये असणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, प्रतीक आपल्या फिटनेसची खूप काळजी घ्यायचे आणि सर्वांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागायचे.

प्रतीक यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या त्यांच्या जिम पार्टनरने 'टीव्ही ९ भारतवर्ष'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अत्यंत मोठा खुलासा केला. "प्रतीक खूप फिट राहायचे. मात्र प्रत्येक घराप्रमाणे त्यांच्याही घरात जेव्हा काही वाद झाले, तेव्हा ते थोडे टेन्शनमध्ये देखील होते आणि त्यामुळे कदाचित डिप्रेशनमध्येही होते" असं म्हटलं आहे.

"आमची मैत्री खूप जुनी होती"

आपल्या मैत्रीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, "आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो, तेव्हा ते खूप प्रेमाने भेटायचे, संवाद साधायचे. आजारपणामुळे त्यांचं जिममध्ये येणं बंद झालं होतं, पण प्रकृती सुधारल्यावर त्यांनी पुन्हा व्यायाम करण्यास सुरुवात केली होती. पण आता काय सांगणार... आमची मैत्री खूप जुनी होती. त्यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल काय सांगू, मी त्यांना खूप चांगलं ओळखायचो. २०१२-१३ पासून म्हणजेच गेल्या १३ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो." मात्र त्यांच्या आजारपणाबाबत कधीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?

मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि भाजपा नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं आज निधन झालं. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं सांगण्यात येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक देवेश चंद्र पांडेय यांनी सांगितलं की, "त्यांना पहाटे ५:५५ वाजता रुग्णालयात आणलं गेलं होतं. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Prateek Yadav's friend reveals depression after family dispute.

Web Summary : Prateek Yadav, Mulayam Singh Yadav's son, passed away. A gym partner disclosed Prateek was stressed and possibly depressed due to family issues. They had been friends for 13 years. He was found unconscious and taken to the hospital where he was declared dead.
टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliticsराजकारणMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू