लंडन : स्थानिक निवडणुकांमधील पराभवानंतर ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या खुर्चीला सुरुंग लागला आहे. स्वतःच्याच मंत्रिमंडळातील ८० मंत्र्यांनी बंडाचे निशाण फडकवत त्यांना पद सोडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या विरोधानंतरही मी देशाचे शासन चालवण्यावरच लक्ष केंद्रित करेन, असे म्हणत स्टार्मर यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी स्टार्मर यांना नवीन नेतृत्व निवडीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यास सांगितले. यावेळी कनिष्ठ गृहनिर्माण मंत्री मियाटा फॅनबुलेह यांनी जनतेला बदलाची अपेक्षा आहे. पण तुमच्याबद्दल जनतेला किंवा मलाही विश्वास वाटत नाही, अशा शब्दांत टीका करत स्वतः राजीनामा दिला.
पीएमसाठी ही नावे चर्चेत
वेस स्ट्रीटिंग (आरोग्य मंत्री): तातडीने बदल झाल्यास यांना पसंती मिळू शकते.
अँडी बर्नहॅम (मँचेस्टरचे महापौर): यांना सप्टेंबरमध्ये निवडणूक झाल्यास फायदा होईल.
अँजेला रायनर (माजी उपपंतप्रधान): पक्षातील एक प्रभावशाली चेहरा.
Web Summary : British PM Keir Starmer faces a crisis after local election losses. Eighty ministers have revolted, urging him to resign. Starmer refuses, focusing on governing. A minister resigned, citing a lack of public confidence. Potential PM replacements include Wes Streeting, Andy Burnham, and Angela Rayner.
Web Summary : स्थानीय चुनावों में हार के बाद ब्रिटिश पीएम कीर स्टार्मर संकट में हैं। अस्सी मंत्रियों ने विद्रोह कर उनसे इस्तीफे की मांग की है। स्टार्मर ने इनकार किया, शासन पर ध्यान केंद्रित किया। एक मंत्री ने सार्वजनिक विश्वास की कमी का हवाला देते हुए इस्तीफा दे दिया। संभावित पीएम प्रतिस्थापनों में वेस स्ट्रीटिंग, एंडी बर्नहैम और एंजेला रेनर शामिल हैं।