शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे केले रद्द
2
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
3
Top Marathi News Live: पंतप्रधानांनंतर आता मुख्यमंत्रीही ॲक्शन मोडमध्ये! सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द
4
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
5
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
6
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
7
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
8
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
9
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
10
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
11
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
12
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
13
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
14
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
15
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
16
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
17
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
18
ऐरोलीत खासगीकरणातून ६९ एकरांवर ‘मिनी सिटी’, सिडकोचे प्रयत्न; हजारो कोटींच्या प्रकल्पाने रिअल इस्टेटला मिळेल झळाळी
19
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
20
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:57 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

13 May, 26 11:57 AM

शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्यावर आता सुनील तटकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 

13 May, 26 11:40 AM

१३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट

प्रतीक यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत जिममध्ये असणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, प्रतीक आपल्या फिटनेसची खूप काळजी घ्यायचे आणि सर्वांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागायचे. त्यांनी अत्यंत मोठा खुलासा केला. "प्रतीक खूप फिट राहायचे. मात्र प्रत्येक घराप्रमाणे त्यांच्याही घरात जेव्हा काही वाद झाले, तेव्हा ते थोडे टेन्शनमध्ये देखील होते आणि त्यामुळे कदाचित डिप्रेशनमध्येही होते" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

13 May, 26 11:25 AM

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 
 

13 May, 26 11:09 AM

सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?

पुणे : नसरापूर येथे लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुरडीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या जखमा टणक वस्तूने केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्या वस्तूबाबत चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत प्रश्न विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असून, तपासात सहकार्य करत नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. वाचा सविस्तर

13 May, 26 11:07 AM

सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मंजूर झालेले परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत.

13 May, 26 10:15 AM

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं

पुणे - जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान दुर्घटनेची घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड (Redbird) कंपनीचे  प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

13 May, 26 10:42 AM

सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी, पाहा काय आहेत नवे दर

केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०,००० रुपयांनी तर चांदी १८,००० रुपयांहून अधिक महागली आहे.

अधिक वाचा

13 May, 26 10:38 AM

सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी, पाहा काय आहेत नवे दर

केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०,००० रुपयांनी तर चांदी १८,००० रुपयांहून अधिक महागली आहे.

अधिक वाचा

13 May, 26 10:33 AM

उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार?

 उत्तर भारतासह महाराष्ट्रातही उष्णतेची लाट तीव्र झाली असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक वृत्त दिले आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या या प्रवासादरम्यान उत्तर आणि पश्चिम भारताला पुढील काही दिवस तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. (सविस्तर वाचा)

13 May, 26 10:15 AM

डोनाल्ड ट्रम्प यांचा आता व्हेनेझुएलावर डोळा? ‘अमेरिकेचे ५१वे राज्य’ दर्शवणारी 'ती' पोस्ट चर्चेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेनेझुएलाचा एक नकाशा शेअर केला असून, त्यात त्या देशाला अमेरिकेचे “५१वे राज्य” म्हणून दाखवण्यात आले आहे.

13 May, 26 10:14 AM

प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे धाकटे भाऊ आणि भाजपा नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण उत्तर प्रदेशात शोकाकुल वातावरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव घरातील किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी घरात उपस्थित असलेल्या लोकांनी कॉल करून या घटनेची माहिती रुग्णालयाला दिली. पती प्रतीक यांच्या निधनावेळी अपर्णा यादव घरात नव्हत्या. वाचा सविस्तर 

13 May, 26 10:12 AM

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर २४ तासांच्या आतच केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. सोन्या-चांदीच्या आयातीवरील सीमा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता भारतात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची आयात करणे महाग होणार असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेतील किमतींवर होणार आहे. (सविस्तर वाचा)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGoldसोनंFuel Hikeइंधन दरवाढFuel Crisisइंधन टंचाईTCS Nashik CaseTCS नाशिक केसIPL 2026आयपीएल २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHeatwaveउष्णतेची लाटThalapathy Vijayथलपती विजयWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर