Share Market Today: बुधवारी सकाळी जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींमुळे बाजारात मोठी हलचाल पाहायला मिळाली. सरकारनं सोने आणि चांदीच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्याचा थेट परिणाम वायदा बाजारावर झाला असून, सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून आली. दुसरीकडे, शेअर बाजाराची सुरुवात वाढीसह झाली असली तरी, काही वेळातच बाजारात सुस्ती आली.
सकाळी ९:३० च्या सुमारास सेंसेक्स ५० अंकांनी घसरून ७४,४६४ वर, तर निफ्टी २० अंकांनी घसरून २३,३५७ च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्ये १६९ अंकांची घसरण होऊन तो ५३,३७९ वर आला होता. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात ०.३ ते ०.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
क्षेत्रनिहाय कामगिरी आणि शेअर्सची स्थिती
बाजार उघडल्यानंतर मेटल, एफएमसीजी (FMCG), फार्मा आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. याउलट पीएसयू बँक, ऑटो, आयटी, मीडिया आणि एनबीएफसी (NBFC) क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली.
टॉप गेनर्स : एशियन पेंट्समध्ये ३ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजी दिसून आली. त्यासोबतच टाटा स्टील, हिंदाल्को, अदानी पोर्ट्स, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले, कोटक बँक आणि आयटीसी या शेअर्समध्ये वाढ झाली.
टॉप लूजर्स : आयशर मोटर्स, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, मॅक्स हेल्थ, ॲक्सिस बँक, इंडिगो, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एटरनल आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
कच्च्या तेलात मोठी उसळी
अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराची आशा मावळल्यानं कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा कडाडल्या आहेत. ब्रेंट क्रूड सुमारे ३ टक्क्यांनी वधारून १०८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलंय. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी चिंतेची बाब असून, यामुळे महागाई आणि रुपयावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
बाजारापुढील आव्हानं
सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष महागाईची आकडेवारी, जागतिक संकेत, 'MSCI' मधील बदल आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) सातत्यानं होत असलेली विक्री आणि सोन्या-चांदीवरील वाढीव आयात शुल्क यामुळे बाजार सध्या दबावाखाली दिसत आहे. सध्या गिफ्ट निफ्टी २३,४४० च्या आसपास स्थिर व्यवहार करत असून अमेरिकन बाजारातील 'डाओ फ्युचर्स'मध्ये ३० अंकांची घसरण दिसून आली आहे.
Web Summary : Indian stock market started sluggishly due to global cues, gold import duty hike, and rising crude oil prices. Sectorally, metals and FMCG gained, while PSU banks and IT declined. Investors await inflation data and quarterly results amid FII selling.
Web Summary : वैश्विक संकेतों, सोने पर आयात शुल्क वृद्धि और कच्चे तेल की बढ़ती कीमतों के कारण भारतीय शेयर बाजार में सुस्ती रही। धातु और एफएमसीजी में बढ़त, जबकि पीएसयू बैंक और आईटी में गिरावट आई। निवेशकों को एफआईआई की बिकवाली के बीच मुद्रास्फीति के आंकड़ों और तिमाही नतीजों का इंतजार है।