देशातील वाढत्या इंधन संकटाच्या आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी स्वतःचा ताफा कमी केला. दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारही सक्रिय झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर कडक पावले उचलली आहेत.
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत इंधन बचतीसाठी कोणकोणते पर्याय अवलंबिता येतील यावर चर्चा करणार आहेत. यामध्ये मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करता येईल का? तसेच ऑनलाईन बैठका घेता येतील का? यावर चर्चा करणार आहेत. या बैठकीत इंधन बचतीसाठीचे कडक निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांचे यापूर्वी मंजूर झालेले परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय कामाच्या निमित्ताने किंवा अभ्यासासाठी जे दौरे आखण्यात आले होते, त्यांना आता स्थगिती देण्यात येणार आहे.
मंत्री शंभुराज देसाईंकडून दौरा रद्द
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी आपला नियोजित पॅरिस आणि लंडन दौरा तात्काळ रद्द केला आहे. देशातील इंधन बचत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
फक्त मंत्रीच नाही, तर अनेक बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवरही या निर्णयाचा परिणाम झाला आहे. आगामी काळात होणारे विविध आंतरराष्ट्रीय करार आणि बैठका आता 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यमातून पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विमान प्रवास आणि त्यावरील होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.
Web Summary : Amidst economic concerns, Maharashtra CM Fadnavis cancelled foreign trips for ministers and officials. This austerity measure aims to reduce government spending, with ministers like Shambhuraj Desai also cancelling their trips. Future international meetings will be held via video conferencing, saving travel costs.
Web Summary : आर्थिक चिंताओं के बीच, महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस ने मंत्रियों और अधिकारियों की विदेश यात्राएं रद्द कर दीं। इस मितव्ययिता उपाय का उद्देश्य सरकारी खर्च को कम करना है, शंभुराज देसाई जैसे मंत्रियों ने भी अपनी यात्राएं रद्द कर दी हैं। भविष्य की अंतर्राष्ट्रीय बैठकें वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से आयोजित की जाएंगी, जिससे यात्रा लागत की बचत होगी।