बॉलिवूडची 'बार्बी गर्ल' आलिया भट नुकतीच 'कान्स'मध्ये सहभागी झाली आहे. कान्समधला तिचा पहिला लूकही व्हायरल झाला आहे. ब्लश पिंक रंगाच्या ऑफ शोल्डर डीप नेक गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससमोर पोज देण्यासाठी सज्ज असताना तिला मात्र फार कोणी ओळखलंच नाही. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कान्सच्या ओपनिंग नाईटला आलिया भटचा जलवा बघायला मिळाला. तिच्या सौंदर्याचं आणि एकूणच लूकचं भारतीयांनी तर खूप कौतुक केलं. ब्लश पिंक गाऊन, ग्लॅम मेकअप, मेस्सी हेअरस्टाईल आणि चकाकणारी ज्वेलरी या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. ती आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर आली आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाईल अशीच अपेक्षा होती. तिने सगळ्यांना हात केला, फ्लाइंग किस दिली आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. मात्र नेटकऱ्यांचं लक्ष फोटोग्राफर्सकडे गेलं. एकही फोटोग्राफर तिचे फोटो काढत नसून सगळ्यांचं लक्ष भलतीकडेच आहे असं दिसत आहे. आलियाला कोणीच ओळखलं नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
'हे पाहून खूप वाईट वाटतंय', 'खरंच आहे..कोणीच तिचे फोटो घेत नाहीये. ती सुद्धा ऑकवर्ड झाली आहे फक्त हसून टाळत आहे', 'हे किती लाजिरवाणं आणि अपमानास्पद आहे', 'ही नक्की कोणाकडे बघून हात दाखवतेय आणि फ्लाइंग किस देतेय?' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. काहींनी आलियाच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं तर काही नेटकऱ्यांना हे खूपच लाजिरवाणं वाटलं.
आलिया भटने गेल्या वर्षीच कान्समध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या लूकचं तेव्हाही कौतुक झालं होतं आणि यंदाही तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे वागणूक मिळणं हे लाजिरवाणं आहे अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या रायच्या लूकसाठी सगळेच आतुर आहेत. ऐश्वर्याला 'कान्सची राणी' असंही म्हटलं जातं. सध्या बॉलिवूडच्या नवीन अभिनेत्रींनाही आता कान्समध्ये झळकण्याची संधी मिळत आहे.
Web Summary : Alia Bhatt's Cannes appearance sparked debate. While her look was praised, a video showed photographers seemingly ignoring her, leading to online criticism and discussions about her international reception.
Web Summary : कान्स में आलिया भट्ट की उपस्थिति पर विवाद। उनके लुक की सराहना हुई, लेकिन एक वीडियो में फोटोग्राफर उन्हें अनदेखा करते दिखे, जिससे ऑनलाइन आलोचना और उनकी अंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया पर चर्चा हुई।