गेल्या काही वर्षात अनेक सेलिब्रिटी हे भारत सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोनं खरेदी करु नका, परदेशात जाऊ नका असं आवाहन करत आहेत तर दुसरीकडे काही लोक भारत सोडून जात आहेत. यातच एका अभिनेत्रीनेही भारत कायमचा सोडल्याचं जाहीर केलं नाही. १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर तिने आता हा निर्णय घेतला. कोण आहे ही अभिनेत्री?
काही टीव्ही शोज आणि बिग बॉस ९ मध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे मंदाना करीमी. एका चाहत्याने मंदानाला 'तू भारत सोडला आहेस का? तुला मुंबईची परत आठवण येणार नाही का?' असा प्रश्न विचारला होता. मंदाना एअरपोर्टवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, "अलविदा भारत..असं मी म्हणेन याची मी कल्पनाही कधी केली नव्हती."
ती पुढे म्हणाली, "हे खूप कठीण होणार आहे. पण भारतात १६ वर्ष राहिल्यानंतर अखेर मी माझं दुसरं घर मागे सोडत आहे आणि आता इथून नवी सुरुवात करत आहे. नवा देश, नवीन घर, सगळं काही नवं."
याआधी मार्च महिन्यात मंदानाने भारत सोडणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मंदानाने भारत सोडण्याचं कारण सांगताना इथल्या लोकांविषयी नाराजी व्यक्त केली. ती म्हणालेली, "गेल्या काही महिन्यांपासून मला भारतात कोणताही पाठिंबा मिळाला नाही. जेव्हा खामेनी यांचे निधन झाले, तेव्हा भारतातील अनेक लोक त्यांच्यासाठी शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मी गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटात काम करणं सोडलं आहे. हा माझा स्वतःचा निर्णय होता. आता मी माध्यमांशी फक्त माझ्या देशातील (इराण) लोकांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी बोलत आहे." मंदानाच्या या भूमिकेनंतर ती चांगलीच ट्रोल झाली होती.
मंदाना करीमी नेटफ्लिक्सवरील 'थार' या सिनेमात शेवटची दिसली होती. २०१५ साली बिग बॉस ९ मध्ये ती रनर अप ठरली होती. 'मै और चार्ल्स','क्या कूल है हम','भाग जॉनी' यांसारख्या सिनेमात तिने काम केलं. २०१६ साली तिने बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केलं होतं. मात्र एकाच वर्षात तिने गौरववर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. मात्र लग्न वाचावं म्हणून तिने नंतर हे आरोप मागे घेतले. तरी २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला.
Web Summary : Mandana Karimi, known for Bigg Boss 9, has left India after 16 years. Citing lack of support and disagreement with some Indians, she departs for a fresh start after her divorce. She expressed difficulty leaving her second home.
Web Summary : बिग बॉस 9 के लिए जानी जाने वाली मंदाना करीमी 16 साल बाद भारत छोड गईं। समर्थन की कमी और कुछ भारतीयों के साथ असहमति का हवाला देते हुए, वह अपने तलाक के बाद एक नई शुरुआत के लिए रवाना हो गईं। उन्होंने अपना दूसरा घर छोड़ने में कठिनाई व्यक्त की।