अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी चीनच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. २०१७ नंतर ट्रम्प यांचा हा पहिलाच चीन दौरा असून, संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत अत्यंत मोठे विधान केले आहे. "इराणच्या मुद्द्यावर आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची किंवा मदतीची गरज नाही, आम्ही स्वबळावर हा विजय मिळवू," असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
इराणवर आमचे पूर्ण नियंत्रण
व्हाईट हाऊसवरून निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी आमची चर्चा सकारात्मक होईल. इराणच्या मुद्द्यावर आमचे पूर्ण नियंत्रण आहे. आम्ही त्यांची लष्करी ताकद पूर्णपणे मोडीत काढली असून आमची नाकाबंदी अत्यंत प्रभावी ठरली आहे." चीनने इराण प्रकरणात मध्यस्थी करावी का? या प्रश्नावर ट्रम्प यांनी स्पष्ट नकार देत म्हटले की, "आम्ही हा प्रश्न शांततेने किंवा अन्य मार्गाने स्वतः सोडवू शकतो."
रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपणार?
इराणसोबतच ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धावरही भाष्य केले. "रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच यावर एक तोडगा निघेल अशी मला आशा आहे," असे विधान त्यांनी केले. ट्रम्प यांचे हे विधान रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नुकत्याच आलेल्या वक्तव्याशी मिळतेजुळते असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर याकडे शांततेचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
मेलानिया ट्रम्प दौऱ्यावर नाहीत, पण मस्क सोबत!
या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वेळी प्रथम महिला मेलानिया ट्रम्प राष्ट्रपतींसोबत चीनला जात नाहीत. मात्र, ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, त्यांचे कुटुंबीय एरिक आणि लारा ट्रम्प उपस्थित आहेत. विशेष म्हणजे, या शिष्टमंडळात प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क आणि अॅपलचे सीईओ टिम कुक यांचाही समावेश आहे, ज्यामुळे या दौऱ्यात मोठे व्यावसायिक करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इराणला अण्वस्त्रं मिळणार नाहीत!
अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. "इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही आणि त्यांच्याकडे ती कधीच नसतील. आम्ही कोणताही खेळ खेळत नाही आहोत, हे त्यांनाही नीट ठाऊक आहे," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले.
Web Summary : Ahead of his China visit, Trump declared the US doesn't need help on Iran, asserting control and military strength. He also hinted at a resolution for the Russia-Ukraine war and warned Iran against nuclear weapons.
Web Summary : चीन यात्रा से पहले, ट्रम्प ने कहा कि अमेरिका को ईरान पर किसी मदद की ज़रूरत नहीं है, और सैन्य ताकत पर ज़ोर दिया। उन्होंने रूस-यूक्रेन युद्ध के समाधान का संकेत दिया और ईरान को परमाणु हथियारों के खिलाफ चेतावनी दी।