शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 08:49 IST

1 / 8
Aadhaar Card News: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार कार्डच्या नियमांत मोठा बदल केला आहे. आता आधार नोंदणी आणि अपडेटसाठी नवीन कागदपत्रांनाही मान्यता देण्यात आली आहे. जर तुम्ही आधार कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करण्याच्या तयारीत असाल, तर आता कोणत्या कागदपत्रांची गरज पडेल हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.
2 / 8
तुम्ही नवीन आधार कार्ड बनवण्याचा विचार करत असाल किंवा आधार अपडेट करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. UIDAI ने नवीन नियमांतर्गत आता अधिक कागदपत्रांना मान्यता दिली आहे, जेणेकरून लोकांना आधार बनवताना कमी त्रास होईल.
3 / 8
याचा थेट फायदा अशा लोकांना मिळेल ज्यांना पूर्वी योग्य कागदपत्रं नसल्यामुळे वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. आता वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांसाठी कागदपत्रांची स्वतंत्र यादी जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती सहजपणे आधार बनवू शकेल.
4 / 8
नवीन नियमांमध्ये मुलांच्या आधार नोंदणीबाबतही मोठा बदल करण्यात आला आहे. आता 'चाईल्ड केअर इन्स्टिट्यूट' (CCI) मध्ये राहणाऱ्या मुलांसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यानं जारी केलेलं प्रमाणपत्रही वैध दस्तऐवज मानलं जाईल. UIDAI ने पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर व्यक्तींशी संबंधित कागदपत्रांनाही मान्यता दिली आहे. परदेशी भारतीय नागरिक कार्ड धारकांना आधार नोंदणी दरम्यान वैध परदेशी पासपोर्ट आणि OCI कार्ड दाखवणं आवश्यक असेल.
5 / 8
आधारमध्ये नाव अपडेट करण्यासाठी पासपोर्ट हा सर्वात मजबूत दस्तऐवज मानला जातो, कारण त्यामध्ये फोटो, पत्ता, जन्मतारीख आणि पूर्ण नाव नोंदवलेले असते. याशिवाय पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्राचा वापरही ओळख पुरावा म्हणून केला जाऊ शकतो. ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी विभागाद्वारे जारी केलेले ओळखपत्र आणि लग्नानंतर नाव बदलण्याच्या परिस्थितीत मॅरेज सर्टिफिकेट देखील मान्य असेल. या कागदपत्रांच्या मदतीनं आधारमध्ये नाव अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते.
6 / 8
जन्मतारखेसाठी जन्म प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. याशिवाय पासपोर्ट, १० वी किंवा १२ वीची गुणपत्रिका देखील वापरली जाऊ शकते. तसंच फिजिकल पॅन कार्ड आणि अशी सरकारी ओळखपत्रे, ज्यामध्ये तुमची जन्मतारीख स्पष्टपणे नोंदवलेली असेल, त्यांनाही UIDAI मान्य दस्तऐवज म्हणून स्वीकारेल.
7 / 8
पत्ता अपडेट करण्यासाठी पासपोर्ट, बँक पासबुक किंवा अलीकडील बँक स्टेटमेंटचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय वीज, पाणी आणि गॅस बिल देखील मान्य असतील, परंतु ही बिले ३ महिन्यांपेक्षा जास्त जुनी नसावीत. भाड्याच्या घरात राहणारे लोक रेंट एग्रीमेंटसोबत पोलीस व्हेरिफिकेशन किंवा नोटरी दस्तऐवज जमा करू शकतात. तसंच नवीन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि हाऊस टॅक्स किंवा प्रॉपर्टी टॅक्स पावती देखील पत्त्याचा पुरावा म्हणून वापरली जाऊ शकते.
8 / 8
जर तुम्ही नवीन आधार बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी जात असाल, तर प्रथम UIDAI ची नवीन कागदपत्रांची यादी तपासा, मूळ कागदपत्रे सोबत ठेवा, तुमचा मोबाईल नंबर योग्य द्या, आधारमधील तपशील काळजीपूर्वक भरा आणि फक्त अधिकृत आधार केंद्रावरच जा.
टॅग्स :Aadhaar Cardआधार कार्डGovernmentसरकार