Gold-Silver Rate Today: केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानं आज कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०,००० रुपयांनी तर चांदी १८,००० रुपयांहून अधिक महागली आहे.
एमसीएक्सवरील स्थिती पाहता ५ जूनच्या डिलिव्हरीसाठीचं सोनं मागील सत्रात १,५३,४४२ रुपयांवर बंद झालं होतं. आज ते १,५४,८५१ रुपयांवर उघडलं आणि काही वेळातच १०,००२ रुपयांच्या मोठ्या वाढीसह १,६३,४४४ रुपयांवर पोहोचलं. याचप्रमाणे चांदीच्या किमतीतही मोठी झेप पाहायला मिळाली आहे. ३ जुलैच्या डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव मागील सत्रात २,७९,०६२ रुपयांवर बंद झाला होता, जो आज २,९०,२२४ रुपयांवर उघडला आणि १८,५४० रुपयांच्या वाढीसह २,९७,६०२ रुपये प्रति किलोवर पोहोचला. विशेष म्हणजे ४ सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या चांदीनं १८,६५७ रुपयांची वाढ नोंदवत ३,०३,२५० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सराफा बाजारातील स्थिती काय?
सराफा बाजारात मात्र सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ दिसून आली आहे. गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याची किंमत १० रुपयांच्या वाढीसह १,५३,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. २२ कॅरेट सोनं देखील १० रुपयांच्या वाढीसह १,४१,१६० रुपयांवर पोहोचलं असून १८ कॅरेट सोन्याचा दर १० रुपयांनी वाढून १,१५,५०० रुपयांवर गेला आहे. चांदीच्या किमतीत १००० रुपयांची वाढ होऊन ती २,९०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सरकारनं आयात शुल्कात केलेल्या बदलांमुळे सोन्या-चांदीच्या आयातीवर परिणाम झाला असून त्याचे थेट पडसाद आजच्या बाजारभावात उमटलेले दिसत आहेत.
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर काय?
| शहर | 24K सोन्याचा दर | 22K सोन्याचा दर | 18K सोन्याचा दर |
| दिल्ली | ₹154140 | ₹141310 | ₹115650 |
| मुंबई | ₹153990 | ₹141160 | ₹115500 |
| कोलकाता | ₹153990 | ₹141160 | ₹115500 |
| चेन्नई | ₹156340 | ₹143310 | ₹119510 |
| लखनौ | ₹154140 | ₹141310 | ₹115650 |
| कानपुर | ₹154140 | ₹141310 | ₹115650 |
Web Summary : Gold and silver prices surged after import duty hikes. MCX gold rose ₹10,000, silver ₹18,000+. Spot markets saw smaller gains; 24K gold reached ₹1,53,990 per 10 grams, silver ₹2,90,000 per kg.
Web Summary : आयात शुल्क बढ़ने के बाद सोना और चांदी की कीमतों में भारी उछाल। एमसीएक्स पर सोना ₹10,000 और चांदी ₹18,000 से अधिक बढ़ी। हाजिर बाजार में कम वृद्धि; 24K सोना ₹1,53,990 प्रति 10 ग्राम, चांदी ₹2,90,000 प्रति किलो।