Monsoon Update : उत्तर भारतासह महाराष्ट्रातही उष्णतेची लाट तीव्र झाली असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक वृत्त दिले आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनच्या या प्रवासादरम्यान उत्तर आणि पश्चिम भारताला पुढील काही दिवस तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
हवामान विभागाने तीव्र उष्णतेमुळे राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला, तर दुसरीकडे, या आठवड्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात मान्सूनचे आगमन होण्याचे संकेतही दिले. विभागाच्या मते, नैऋत्य मान्सून या आठवड्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र असून, ते पुढील दोन दिवसांत आणखी मजबूत होऊ शकते.
मान्सूनची वाटचाल आणि पाऊस
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून ते पुढील दोन दिवसांत अधिक मजबूत होईल. यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
ईशान्य भारत- आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात १३ ते १८ मे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा.
दक्षिण भारत- तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता.
पहाडी भाग- १५ मे पासून सक्रिय होणाऱ्या नवीन पश्चिमी प्रणालीमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पाऊस व हिमवृष्टीचा अंदाज आहे.
या राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार
मैदानी प्रदेशात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेदरम्यान, राजस्थानमधील बारमेरमध्ये तापमान ४७.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पश्चिम राजस्थानमध्ये पुढील आठवडाभर तीव्र उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा दिला आहे. पूर्व राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही पुढील चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट राहील. हवामान विभागाने दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे. पुढील काही दिवसांत तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये १३ ते १८ मे दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. बुधवारी पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या हिमालयीन प्रदेशांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १५ मे पासून उत्तर भारतात एक नवीन पश्चिमी प्रणाली सक्रिय होईल, यामुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते.
Web Summary : Monsoon expected in Bay of Bengal by week's end, bringing relief. North and West India brace for continued heatwave. Heavy rainfall alerts issued for Northeast and South India, with potential snowfall in Himalayan regions.
Web Summary : बंगाल की खाड़ी में सप्ताह के अंत तक मानसून की उम्मीद, जिससे राहत मिलेगी। उत्तर और पश्चिम भारत में गर्मी की लहर जारी रहेगी। पूर्वोत्तर और दक्षिण भारत के लिए भारी बारिश की चेतावनी, हिमालयी क्षेत्रों में बर्फबारी की संभावना।